एकता संमेलनात दोन दिवसीय काव्य संमेलन संपन्न!

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२१जाने.२०२५

प्रतिनिधी,

शिरूर कासार - राष्ट्रसंत भगवानबाबा साहित्यनगरी  दहिवंडी ता.शिरूर कासार येथे सातवे एकता मराठी साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष प्राचार्या डाॅ.दिपाताई क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झाले. पहिल्या दिवशी उद्घाटन सत्र झाल्यानंतर दुपारी तीन ते पाच यावेळेत एकता फाउंडेशन परभणी जिल्हाध्यक्ष बालसाहित्यिक पु.ना.बारडकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिले काव्य संमेलन संपन्न झाले. यामध्ये एकताचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, परभणी महानगरीय अध्यक्षा प्रा.शोभाताई घुंगरे, एकताचे युवक प्रदेश निमंत्रक इम्रान शेख, कैलास तुपे, आनंदा साळवे (श्रीरामपूर), प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, प्रा.अंबादास केदार, रसूल पठाण (उदगीर), रामदास कांबळे (लातूर), माधव वाघमारे (जळकोट), चंद्रकांत मोरे, तुकाराम हरगिले (अहमदपूर), आकांक्षा सोनवणे, राहुल इंगोले, संदेश वाघमारे (संभाजीनगर), प्रदीप बोडखे, आत्माराम शेवाळे (शेवगाव), परशुराम नागरगोजे (जामखेड) या निमंत्रित मान्यवरांचा सहभाग होता. या काव्य संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन एकताचे आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी केले.

         दुसर्‍या दिवशी म.सा.प.माजलगाव चे सचिव बालासाहेब झोडगे यांच्या अध्यक्षतेखालील काव्यसंमेलनात एकताचे प्रदेश संघटक देवीदास शिंदे, बालाप्रसाद चव्हाण, मोहन राठोड, वैभव सोळंके (माजलगाव), बाळासाहेब नागरगोजे, परशुराम सोंडगे, संजय सावंत, अंकुश नागरगोजे (पाटोदा), राजेंद्र उदारे (पाथर्डी), सोनाली गरड (पैठण), प्रिती टेकाळे (गेवराई), सखाराम आंधळे, मल्हारी खेडकर, भाग्यश्री ढाकणे, एकता विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष कार्तिक कांबळे, अंजली गवई, आरती परळकर (बीड) या मान्यवरांसह विशाल पानखडे, कु.भार्गवी तुपे, कु.कार्तिकी अनाप, आकांक्षा जगताप, भागवत बडे, शिवम मानूरकर, पायल सवासे नवोदित कवींनी सहभाग नोंदवला. या काव्य संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन एकताचे संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी के.बी.शेख यांनी केले.

         रसिक श्रोत्यांना सलग दोन दिवस काव्य संमेलनाची मेजवानी मिळाल्याने त्यांचा उत्साह वाखनण्याजोगा होता. या दोनही काव्य संमेलनात निमंत्रित मान्यवरांसह अनेक शालेय, महाविद्यालयीन नवकवींनी सहभाग घेत आपल्या रचना उपस्थितांसमोर सादर केल्या व आपल्याला संधी दिल्याबद्दल त्यांनी साहित्यिक अनंत कराड, पत्रकार गोकुळ पवार, एड.भाग्यश्री ढाकणे, शिवलिंग परळकर, नितीन कैतके, शिवचरित्रकार कैलास तुपे, राजेश बीडकर, फौजी कैलास खेडकर, मल्हारी खेडकर, व्यंगचित्रकार दिपक महाले, डाॅ.शोभा सानप, रंजना फुंदे, रंजना डोळे, लता बडे, महादेव राऊत यांच्यासह एकताच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.

Related Post