गोकुळ कुंभार यांचे कडून श्री कमलादेवीस रु .५,५५५/-देणगी प्राप्त ..

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा

दि .१९जाने .२०२५

प्रतिनिधी ,उज्वला उल्हारे 

 श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने 

श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या १ वर्षा पासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे  अध्यक्ष सोमनाथ चिवटे , सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून  कु.रेवती गोकुळ कुंभार हिच्या आज असणाऱ्या पहिल्या वाढदिवसानिमित्त  आई कमलादेवी महापूजा (भोगी) करून तसेच इतर खर्चाला फाटा देऊन श्री जगदंबा कमला देवी मंदिर जतन संवर्धन कामास देणगी देऊन आगळ्यावेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा केला.

   श्री.गोकुळ कुंभार रा. करमाळा यांच्या कडून देणगी

रू. ५,५५५|_(पाच हजार पाचशे  पंचावन्न फक्त)  रोख  शनिवार दिनांक १८.०१.२०२५. रोजी रोख देणगी प्राप्त झाली आहे. 

या निमित्त त्यांचा सत्कार श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान. ट्रस्ट कडून  कन्हैयालाल पुराणिक ,पद्माकर सूर्यपुजारी, यांनी सत्कार केला. यावेळी कुमारी रेवतीचे आई, बाबा, आजी, आजोबा व कुंभार परिवार उपस्थित होते.

या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जतन संवर्धन कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील  मंदिर  समिती च्या माध्यमातून करण्यात आले आहे.

तसेच  ऑनलाइन  देणगीची सुविधा उपलब्ध आहे.संपर्क अशोक गाठे.व्यवस्थापक मो. नंबर ९४०४७०८९२४

Related Post