संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१९ जाने.२०२५
लिंपणगाव (प्रतिनिधी) लोकनेते, मा.आ.शिवाजीराव नारायणराव नागवडे (बापु) यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. द्वितीय पुष्प गुंफण्याकरता शिवव्याख्याते प्रा.अफसर शेख उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी शिवव्याख्याते प्रा.अफसर शेख यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश रसाळ यांनी केले तर पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे उपप्राचार्य चंद्रभान कातोरे यांनी करून दिली.
शिवव्याख्याते प्रा.अफसर शेख यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा महाराष्ट्र या विषयावर व्याख्यान दिले.त्यांनी महाराजांचे संस्कार आपण विसरत चाललो आहोत. महाराजांचे ६ कार्य म्हणजे राजेंची दूरदृष्टी, शिस्त, शास्त्र, शस्त्र, संघटन आणि प्रशासन महत्वाचे आहेत. इतिहासात एकमेव राजा पाठीवर ढाल आणि हातात तलवार असणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी होय.शिवाजी महाराजांचे विचार आज लाख मोलाचे आहेत.आयुष्यात जिजाऊ नाही होता आले तरी चालेल पण एक तरी शिव चरित्राचा गुणधर्म आपल्या मुलांमध्ये उतरवा. तुमच्या आयुष्यात महाराज नाही होता आले तर तुमच्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्या अशी मुलांकडून आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागवडे कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव रायकर यांनी भूषविले.त्यांनी बापू स्वभावाने व आचरणाने आदरणीय होते असे सांगितले.
सूत्रसंचालन प्रा.योगेश शेलार व प्रा.प्रवीण नागवडे यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.प्रमोद परदेशी यांनी केले. या कार्यक्रमानंतर पारंपरिक पोषाख सादरीकरण झाले. यानंतर समाज परिवर्तन हा एकांकिकेचा विषय घेऊन अत्यंत सुंदर एकांकिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या.तसेच बॉलिवूड पोषाखाचे सादरीकरण बॉलिवूड पोषाख सादरीकरण झाले.
या कार्यक्रमासाठी भाऊसाहेब नेटके,मुकुंद सोनटक्के, डॉ.धर्मनाथ काकडे,पोपटराव बोरुडे,निशिकांत निंभोरे,विजय मुथा,बाळासाहेब काकडे,समिरानजी नागवडे,आमीन शेख,हरिदास खेतमाळीस,बाळासाहेब भोर,राजेंद्र हिरवे,दत्ता जगताप,श्रीरंग साळवे उपस्थित होते तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.