जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश - प्रा.युवराज पाटील

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१९जाने.२०२५

 लिंपणगाव (प्रतिनिधी )लोकनेते मा.आ.स्व. शिवाजीराव (बापू) नारायणराव नागवडे यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त लोकनेते मा.आ.स्व.शिवाजीराव (बापू) नारायणराव नागवडे प्रतिष्ठान व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्याकरता प्रेरणादायी वक्ते म्हणून युवराज पाटील उपस्थित होते. 

सदर व्याख्यानमालेचे प्रास्ताविक डॉ.धर्मनाथ काकडे यांनी केले तर त्यांनी प्रास्तविक करताना,बापूंनी केलेले सामाजिक,शैक्षणिक व राजकीय कार्याची ओळख करून दिली. व्याख्यात्यांची ओळख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी करून दिली.

         व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते युवराज पाटील यांनी भविष्य उज्ज्वल आहे या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी अनेक प्रेरणादायी व्यक्तींचा प्रवास किती खडतर प्रवासातून झालेला आहे याची जाणीव करून दिली.उज्वल भविष्यासाठी योग्य व काळानुसार स्वप्न असले पाहिजे. क्षमता आणि मर्यादा योग्य वयात समजल्या पाहिजे.मन, मनगट आणि मेंदू आपल्या ताब्यात पाहिजेत.सयंम,जबाबदारी,नम्रता,चारित्र्य व आईवडीलांचे आदर्श खुप महत्त्वाचे आहेत.विद्यार्थ्यांनो स्वप्नांच्या पाठीमागे निष्ठावान होऊन धावलात तर आपले भविष्य उज्वल आहे.क्षमता व मर्यादा योग्य वयात मिळाव्यात,प्रामाणिक प्रयत्नात यश दडलेले आहे.बापाला मारलेली मिठी ही जगात सर्वात मोठे यश आहे.

 सदर व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष म्हणून सौ.अनुराधाताई राजेंद्र नागवडे या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यानी जीवनाकडे बघत असताना सर्वांगीण अंगाने विचार करा.आपण खुप कष्ट करा. मदत करणाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडवावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.आभार प्रदर्शन प्रा.बाळासाहेब महारनुर यांनी केले तर प्रा.शंकर गवते व प्रा.लोखंडे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी रांगोळी स्पर्धा,सलाड मेकिंग स्पर्धा,पाक कला स्पर्धा,मेहंदी स्पर्धा व आनंदी बाजार खुप आनंददायक साजरा झाला.

या कार्यक्रमासाठी मा.अनुराधाताई नागवडे उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत सुरेखाताई लकडे,मनीषा मुथा,सोनाली जामदार उपस्थित होत्या. तसेच आनंदी बाजार या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भाऊसाहेब नेटके (संचालक) व प्रवीण लबडे (संचालक) उपस्थित होते.त्यांनी आनंदी बाजारमध्ये सहभागी विद्यार्थ्याना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे गुणगान केले.

 या व्याख्यानमालेसाठी कारखान्याचे संचालक विठ्ठल जंगले, योगेश भोईटे, सुरेश रसाळ,विजय मुथा,सुरेखाताई लकडे, धनसिंगपाटील भोईटे,विलास काकडे,मनीषा मुथा,अमोल लगड,मधुकर काळाने,सोनाली जामदार, दिनेश आदलिंगे हे उपस्थित होते.तसेच श्रीगोंद्यातील नागरिक विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, प्राध्यापक, प्रध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या  संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related Post