लोणी व्यंकनाथ येथे रासेयो हिवाळी शिबिर उद्घाटन समारंभ संपन्न!

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१९जाने.२०२५

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विविध उपक्रम युवकांचे व्यक्तिमत्व घडवणारे असतात. युवकांना स्वावलंबनाचा मंत्र अशा शिबिरांमधून मिळतो. स्वावलंबी बना,  असे विचार बाळासाहेब नाहाटा यांनी अध्यक्षीय भाषणातून मांडले. ते लोणी व्यंकनाथ येथे आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझ्या देशासाठी युवक, डिजिटल साक्षरतेसाठी युवक या उपक्रमांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरात अध्यक्ष म्हणून त्यांनी विचार व्यक्त केले. शिबिराचे उद्घाटन सुभाषशेठ गांधी यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी  स्वागतपर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, या शिबिरात नायब तहसीलदार पंकज नेवसे, प्रा. चंद्रकांत पाटील, डॉ. अरुण रोडे, श्रीराम थोरात, डॉ. प्रकाश साळवे, प्रा. रमेश थोरात इत्यादी वक्त्यांचे भाषणे होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन, कथाकथन, श्रम प्रतिष्ठेतून आरोग्याकडे, डिजिटल युवक व साक्षरता, सामाजिक सलोखा व युवक आणि अंधश्रद्धा निर्मूलनात युवकांची भूमिका इत्यादी विषयांवर वरील  वक्त्यांचे भाषणे होतील. तसेच विशेष श्रमसंस्कारही दिले जातील. असे प्राचार्य डॉ. महादेव जरे म्हणाले. 

या समारंभ प्रसंगी बाळासाहेब थोरात, ज्ञानदेव बापू मगर, राजेंद्र भागवत, पंढरीनाथ खंडागळे, हनुमंत मगर, अनिल खेडकर ,संतोष काकडे, मयूर गोरखे,  श्रेयश गांधी, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे,  उपप्राचार्य शहाजी मखरे, प्रा. मधुकर खोमणे, ग्रामसेवक कराडे,  डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. राहुल गायकवाड, डॉ. सुप्रिया पवार, प्रकल्प अधिकारी डॉ. अनुराधा ताटे, प्रा. प्राजक्ता वारे, डॉ. सुप्रिया पवार, प्रा. सोनाली रायकर, प्रा. प्रियंका मस्के, प्रा.  एस. आर. मखरे, प्रा. शितोळे पी. आर.,शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. राम ढगे यांनी केले. प्रकल्प अधिकारी प्रा. भाऊसाहेब बुलाखे यांनी आभार मानले.

Related Post