सर्वांना विश्वासात घेऊन पुढील कामकाज सुरळीत करू-बापूसाहेब गायकवाड

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२४सप्टेंबर २०२४

घोगरगाव प्रतीनीधी,

श्रीगोंदा तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची ५३वी सर्वसाधारण वार्षिक सभा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गोडाऊन मध्ये घेण्यात आली. नूतन चेअरमन बापूसाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्वसाधारण सभेवेळी नगण्य सभासद मंडळी उपस्थित असल्याने कोरम अभावी  सभा एक तास सभा तहकुप करून उपस्थित सभासदांमध्ये सभा घेण्यात आली .प्रसंगी मागील सभेच्या ईती वृत्ताचे वाचन आणि खर्चाचा ताळेबंद सचिव विनायक ससाने यांनी वाचन करताना त्यावर आक्षेप घेत सत्यवान शिंदे यांनी सचिव नियुक्ती, सचिवाचे वय यावर आक्षेप घेत खुलासा करण्याची मागणी केली...

तदनंतर ज्येष्ठ माजी संचालक ह भ प संपत महाराज कुचेकर यांनी विविध परिस्थितीने ग्रासलेल्या सभासद मंडळींना केलेली सक्तीची वसुली नोटीस यावर आक्षेप घेताना बँकेकडून मिळालेली थकित  यादी आणि सभासद कर्जमाफी किंवा नाम मात्र व्याजाची रक्कम याची शहानिशा न करता मनमानी वसुलीवर आक्षेप घेत कर्जमाफीच्या धोरणावर माध्यमांचे कात्रण दाखवत खुलासा करण्याची मागणी केली ...

पुढे बोलताना माजी संचालक कांतीलाल कोकाटे यांनी नूतन संचालक मंडळाचे वतीने छापलेल्या अहवालाबाबत बोलताना पारदर्शक धोरण नाही ,ताळमेळ नाही, सभासदांना एक आणि अहवाल आणि ठराविक मंडळीला रंगीत  अहवाल ही बाब सभासदांची अवहेलना करणारी असून संघ तोट्यात असताना या खर्चाची तरतूद कुठे आणि कशी केली याच्या खुलासा होण्याची मागणी केली.

 सवाल जबाबांचा गदारोळ चालू असताना श्रीगोंदयाचे युवा सभासद घोडके यांनी नूतन अहवालावर महापुरुषांचे फोटो असणे आवश्यक असल्याने या संचालक मंडळाला महापुरुषांच्या विचाराचा विसर पडला असून महापुरुषांच्या विचारापासून भरकटलेले संचालक  असल्याचे टीकास्त्र सोडले..

 सभेला सभासद उपस्थिती नसल्याचे खंत व्यक्त करत प्रत्येक सभासदांकडे सभेचा अजेंडाच पोहोच झाला नाही किंवा मुद्दाम केला नाही हा अनागोंदी किंवा मनमानी कारभार असल्याची खंत व्यक्त करत युवा सभासद संतोष गोरखे यांनी सत्ताधारी संचालक मंडळाचा केला निषेध केला..

माजी चेअरमन नंदकुमार ससाणे यांनी सत्ताधारी संचालक मंडळीच्या कामकाजाबद्दल शंका व्यक्त करत माझे काळात मी अनेक कर्ज वाटप केले भरगच्च वसूल केला पण याच राजकीय भेदक मंडळींनी विरोधी वातावरण तयार करून मला पाय उतार केले याबद्दल नाराजी व्यक्त केली ...

उपस्थित सभासद मंडळीच्या वतीने बोलताना ज्येष्ठ माजी चेअरमन भगवानराव गोरखे यांनी मनमानी कारभारावर आगपाखड करताना सत्ताधाऱ्यावर शरसंधान साधले पुढे बोलताना ते म्हणाले ताळमेळ नसणारे हे कारभारी मंडळ आहे ,झालेला निर्णय केला की घेतला याबाबत एकसुत्री निर्णय नसतो आम्हांला विश्वासात घेतले जात नाही असे काही संचालक विश्वासाने सांगतात त्यामुळे त्यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. सभासद मंडळीला सक्तीच्या नोटीस दिल्या बद्दल प्रचंड नाराजी आहे संघ चालवायचा म्हणलं की वसुली झाली पाहिजे पण सर्व ताळमेळ पहावे लागतात नैसर्गिक परिस्थिती आणि शासनाची भूमिका पहावी लागते याचा अवमेळ जाणवत असून कित्येक वर्ष सभासदांची अस्मिता जपताना कधी कोणाच्या भावना दुखावल्या नाहीत जे काय राजकारण झाला असेल त्याला जोड समाजकारणाची होती आणि वेळेच्या परिस्थितीची होती पण कायमच सामाजिक ताळमेळ जपण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व सुशिक्षित संचालक पदाधिकारी आहात आपल्याकडून पारदर्शी दूरदर्शी कामांची अपेक्षा आहे सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे अन्यथा संघाच्या अस्मितेला तडा जाणार आहे याचे भान ठेवावे ..

प्रसंगी युवा बेरोजगार यांनी ही सर्व परिस्थितीचे अवलोकन करत मी बेरोजगार आहे आपणाकडून व्यवसाय निर्णयाची अपेक्षा आहे पण असं काही दिसत नसल्याने सर्व अवमेळ जाणवत असल्याने हातबल होऊन भावना विवश होउन अश्रू अनावर झाले .

सभासदांची कुजबुज आणि संचालकाचा गोंधळ ,दिशाभूल करण्याचा प्रयत्न यामुळे काही विषयाचे ठराव लगबगीने पारित झाल्याचे चित्र दिसून आलं एकंदरीत सभा खडाजंगी अंशत वादळी तसेच काही प्रमाणात खेळीमेळीत संपन्न झाली .

आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा विरोधी गटाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी उपस्थित सभासद मंडळीच्या अंतस्थ चर्चेचे अवलोकन करताना ढिसाळ अवमेळी नियोजनावर तासारे ओढत सत्ताधारी मंडळींनी प्रसारमाध्यमांचे दिशाभूल करून सर्व काही अलबेल असल्याचा कांगावा करत एकतर्फी बातम्या प्रसिद्ध झाल्या हे जरी असले तरी या सर्वप्रसंगी सन्माननीय पत्रकार पदाधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी याचे वास्तव समाजासमोर मांडायला हवे होते. प्रसार माध्यमे देशाच्या लोकशाहीमध्ये संसद, राज्याचे विधानभवनामध्ये सत्ताधारी आणि विपक्ष यांची समतोल बाजू समाजासमोर मांडत असतात हे आपण पाहतो येथे मात्र आम्ही गत निवडणुकीमध्ये कोणाचेही राजकीय पाठबळ नसताना तोडिसतोड मतदान घेतले.. आजही येथे काही निवडक जेष्ठ सभासदासमवेत वास्तविकता मांडताना सभेचे वास्तव समाजासमोर येणे अपेक्षित होते याची खंत व्यक्त करत पुढील काळात माध्यमांनी आमची दखल घ्यावी असे ते म्हणाले ..

विद्यमान कारभारी मंडळीला उद्देशून ते म्हणाले आपण चांगले कामे केले तर त्याचे समर्थन करू आपले स्वागत करू पण सभासदांचे गैरहिताचे आणि संघाशी बाधक निर्णय घेतले तर त्याचा प्रखर विरोध करू त्यामुळे आपण पारदर्शी कामे करावीत. 

आजची परिस्थिती पाहता संघ तोट्यात आहे मग न मात्र बाकीसाठी सभासदांची बैठक न घेता खर्चिक नोटिसांचा फतवा कशाला? नैसर्गिक परिस्थितीला अंदाज न घेता सभासदांची पिळवणूक कशाला? व्याजाच्या रकमा का वाढल्या याला दोषी कोण? अहवाल छपाई बाबत राजकारणी आणि सभासद यांच्यात भेदभाव कसा?

निवडणुकी वेळी सत्ता स्थापने याबाबत सर्व राजकीय मंडळीचे उंबरठे झिजवताना त्यांचा अहवालामध्ये फोटो का नाही? किंवा फक्त एकतर्फी बँकेचे पदाधिकारी संचालकाचाच फोटो घेतला असल्याचा , कांगावा करतांना मग त्यामध्ये बँक संचालिका अनुराधाताई नागवडे यांचा फोटो का नाही ?अनेक बाबींवर शंका आणि आक्षेप आहेत हा संघ बारा बलुतेदार मंडळीचा आहे त्यामध्ये सर्व पक्षीय नेत्यांचे योगदान आहे याचे आपण भान ठेवावे संघाला कोणत्याही एका राजकीय नेत्याच्या दावणीला बांधू नये यावर बोलताना कर्जमाफी नंतर सर्व व्याजमाफी बाबत शासनाकडे कोणता पाठपुरावा केला याचा खुलासा करावा असे ते म्हणाले.लवकरच संघटनेच्या माध्यमातून थकीत व्याजी सभासदांबरोबर समन्वय साधणार असून व्याजमाफी बाबत शिष्टमंडळासमवेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सुतोवाच केले. 

सर्वसाधारण सभेला उपस्थित ज्येष्ठ माजी चेअरमन ,संचालक, विपक्ष आणि सभासद मंडळी यांच्या प्रखर आणि परखड सूचनांचे अवलोकन करत सर्व विषयावर खुलासेवार उत्तर देताना चेअरमन बापूसाहेब गायकवाड यांनी पुढील विकासात्मक सकारात्मक बाबीवर बोलत आपण केलेल्या सूचना किंवा अपूर्ण बाबींवर भविष्यात संवेदनशील राहून आपणा सर्वांना विश्वासात घेऊन पुढील कारभार पारदर्शी करणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले आगामी काळात सभासदांच्या हिताची निर्णय घेणार आहे राज्यात बलुतेदर संघाची दैनी अवस्था असून आपल्या संघ राज्यामध्ये आगळावेगळा उपक्रम राबवणार आहे. सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांची अनेक वेळा भेट घेतलेली आहे लवकरच थेट कर्ज वाटपासाठी प्रयत्न करणार आहे मार्केट कमिटी कडून भव्य गोडाऊनची व्यवस्था झालेली आहे तेथे विविध व्यवसाय विषयक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे.

 तसेच शासनाचे विश्वकर्मा योजना, खादी मंडळाकडून विशेष घटक योजना गतिमान आहे त्या माध्यमातून सभासद मंडळींना लाभ देणार आहे 

शासनाची कर्जमाफी वगळता जे व्याज थकले ते आजचे नाही मागील संचालक मंडळींनी त्यावर तत्परता दाखवली नाही आम्ही बँकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला यादी घेतली प्राथमिक नोटिसा बजावल्या काही प्रमाणात वसूल झाला मात्र आपली नाराजी नक्की आहे पण व्याजमाफीसाठी प्रस्ताव सहकारी बँकेकडे सादर केलेला आहे त्याचा जोमाने पाठपुरावा चालू आहे .

संघाचे कार्यालय दर्जेदार सुयोग्य असावे अशी धारणा असून त्याबाबत नवीन कार्यालय बांधकामाची परवानगी सहकारी बँके दिलेली आहे आपणा सर्वांचे साथीने वाढीव निधीचे नियोजन करता येईल जो कर्जदार एक रकमी कर्ज परत फेडेल त्यांना ४ टक्के सुट मिळणार आहे ..

आदि सर्व विषयांचा समन्वय साधत जेष्ठ आणि तज्ञ संचालक वसंतराव सकट यांनी बोलताना सांगितले की काही बाबी ,काही मान्यवरांचे फोटो हे नजर चुकीने राहिले असतील ते राजकारण समजू नये पुढील काळात याबाबत तंतोतंत पारदर्शकता आणि दिशादर्शक कारभार केला जाईल याबाबत सर्वांना आश्वासित केले.

प्रसंगी व्हा.चेअरमन बबन श्रीराम, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा माजी चेअरमन अंकुश शिंदे, माजी चेअरमन सौ संध्या ससाने, संचालक दिलीप तोरडमल, दुर्योधन लोखंडे, नानासाहेब ससाने ,ज्ञानदेव गोरखे, रमेश कळमकर, सुनील काळे, सौ. मीरा शिंदे, रेवती घाडगे माजी संचालक रतन ससाने, ज्ञानदेव शिरवाळे आदी संचालक मंडळी उपस्थित होते.

Related Post