डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मढेवडगाव विद्यालयात साजरी.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२२सप्टेंबर २०२४

प्रतिनिधी, 

शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी  बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत पोहचवणारे , रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज २२ सप्टेंबर १३७ वी  जयंती.

 रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात शिक्षणमहर्षी  पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३७ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.


मिरवणूकीपूर्वी रथातील प्रतिमेचे पूजन रवींद्रराव महाडिक व गणेश मांडे विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे, पर्यवेक्षक विलास सुलाखे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

ढोलांच्या तालावर लेझीम झांज पथक टिपरी नृत्य शिवगीताने मिरवणूक वाजत गाजत विद्यालय पासून ते ग्रामपंचायत, सोसायटी पर्यंत भव्य काढण्यात आली ग्रामस्थांचे मने वेधून घेतली होती  मीनाक्षी कदम, अर्चना कोरडे ,वैभव काळोखे, लक्ष्मी बोलणे, रोशनी भवर, स्नेहल धुमाळ, सुमती सुरसे, महादेवी माने, या सेवक बंधू भगिनींनी विद्यार्थ्याकडून उत्कृष्ट तयारी करून घेतली.

विद्यार्थ्यांनी प्रत्येक राज्यातील खास अशी वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत ग्रामस्थांना सर्वधर्म समभावतेचा राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. त्यानंतर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष सूचना पर्यवेक्षक सुलाखे साहेबांनी मांडली. अनुमोदन रामदास पवार यांनी दिले. विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे यांनी शाखेचे प्रस्ताविक व अहवालवाचन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान दिघे व अर्चना कोरडे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील  गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक प्रणव नलगे , विद्यालयातील आदर्श विद्यार्थी विशाल गोडसे, धनुर्विद्या  स्पर्धेत ऋतुपर्ण साळवेची विभागीय पातळीवर निवड झाल्याबद्दल, तसेच  पावसाळी क्रीडा स्पर्धेत योगदान दिल्याबद्दल धनंजय मांडे,दादा दरेकर,तसेच रमेश वसव शाळेची विविध कामे अल्प दरात केल्याबद्दल , विद्यार्थ्यांना स्वादिष्ट जेवण दिल्याबद्दल म्हातारं पिंप्री चे माजी उपसरपंच सुभाष तावरे यांचा सपत्नीक सत्कार  विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र  दादा नागवडे बोलताना म्हणाले ,जीवनात प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही . कार्यक्रमाचे अध्यक्ष  माजी आमदार राहुलदादा जगताप  यांनी कर्मवीरांच्या कार्याचा परिचय करून दिला. 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ विधीतज्ञ राहुल जामदार साहेब  बोलताना म्हणाले रयत शिक्षण संस्था ही सामाजिक चळवळ म्हणून उभी आहे . 

याप्रसंगी थोर देणगीदार रवींद्र राव महाडिक , स्थानिक स्कूल कमिटी सदस्य नंदिनी काकी वाबळे , विजयराव उंडे ,  जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्मितल भैया वाबळे, पं.स.सदस्य जिजाबापू शिंदे, शि ना सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे,   विलासराव वाबळे,सरपंच प्रमोद राव शिंदे,  उपसरपंच राहुल साळवे,  सोसायटी चेअरमन प्रकाशराव  उंडे, ग्राम पंचायत सदस्य योगेश मांडे, अभय गुंड, प्रा फुलसिंग मांडे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन उंडे,  विलासराव वाबळे,   जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे , पत्रकार ज्ञानदेवराव गवते , आदेश उबाळे,कुंडलीकराव शिर्के , इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अरुण पवार सर यांनी मानले. आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Post