सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी रवींद्र शिरसाठ यांची नियुक्ती.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.३१ऑगस्ट २०२४

  लिंपणगाव (प्रतिनिधी)- स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाचे अराजकीय व्यासपीठ आहे. कुणी कुठल्याही पक्षात रहा! फक्त मराठा म्हणून स्वाभिमानी मराठा महासंघात सामील व्हा! असे धोरण घेऊन संघटना देश पातळीवर काम करत आहे. याच धर्तीवर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अहिल्यानगर सोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष पदी रवींद्र शिरसाठ पाटील  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी दिले.

रवींद्र शिरसाठ पाटील यांनी निवडी प्रसंगी सांगितले की, मराठा समाजातील बेरोजगारी वाढत आहे. समाजातील शेतकरी, तरुण आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेत असल्याने मराठा आरक्षण समाजासाठी वाघिणीचे दूध आहे. त्यामुळे संघटना मराठा आरक्षण मिळवणारच.

रवींद्र शिरसाठ पाटील यांची अहिल्यानगर सोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वाभिमानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दिपक पवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनिता ताई पाटील,  प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे,  राष्ट्रीय अध्यक्ष कोकिळा ताई पवार, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अभिजित खैरे, प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, दक्षता आघाडी प्रदेशाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे सरकार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलका सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताताई जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त पोखरकर,पुणे शहर अध्यक्ष सवित खोजे, अहिल्यानगरचे जिल्हा अध्यक्ष भानुदास वाबळे पाटील आदिंनी स्वागत केले आहे.

                                चौकट 

  या निवडीप्रसंगी मा रविभाऊ शिरसाठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की; मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे, ते आरक्षण आम्ही मिळवण्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्यासाठी तय्यार आहोत., संपूर्ण जिल्ह्यातील मराठा बांधवांना विनंती आहे की; आपण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे यांच्या अभूतपूर्व लढ्याला बळ द्या! आणि आमच्या स्वाभिमानी मराठा सेवा संघात सामील व्हा! असे शिरसाठ यांनी सांगितले.

Related Post