संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदे
दि.२८ऑगस्ट २०२४
प्रतिनिधी,
काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुल मध्ये झालेल्या तालुकास्तरीय मुले/मुली शालेय फुटबॉल स्पर्धेत परिक्रमा सायन्स कॉलेजच्या17 वर्ष मुले संघाने द्वितीय क्रमांक तर 19 वर्ष मुले, व 19 वर्ष मुली या संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून कोपरगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार श्री.बबनरावजी पाचपुते,परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री.विक्रमसिंह पाचपुते,मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड.श्री.प्रतापसिंह बबनरावजी पाचपुते, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा.अनिल पुंड, अकॅडमी डायरेक्टर सौ.इंद्रायणी पाचपुते,अकॅडमी डेप्युटी डायरेक्टर प्रा. संजीव कदम पाटील, प्राचार्य संजीवन महाडिक,प्राचार्य डॉ.सुनील निर्मळ ,,प्रा.डॉ.सुदर्शन गिरमकर,प्राचार्य डॉ. रमेश शिंदे,प्राचार्य डॉ.पांडुरंग इथापे, प्राचार्या डॉ.सुवर्णा निर्मळ,प्राचार्य जेम्स मेनन, यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.या खेळाडूंना प्रा.रवींद्र काळाने, प्रा.रोहन रंधवे यांचे मार्गदर्शन लाभले.