पिंपळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न!!

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२३ ऑगस्ट २०२४

प्रतिनिधी/पिंपळा

आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील पिंपळेश्वर माध्यम व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा दहावी आणि बारावीचा प्रथम येणाऱ्या क्रमांक मिळाल्याबद्दल सौ.कै.साखरबाई खटके व कै.रामचंद्र खटके दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुणे जिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले डॉ.अशोकराव खटके व डॉ.संजय खटके यांच्या संकल्पनेतून गुणगौरव स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात बक्षीस देऊन सत्कार करण्यात येतो.या ही वर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे बक्षिस देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी उपस्थित कडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मा‌.रामदास शेंडगे.सरपंच सिमा भवर.ग्रा.पं.सदस्य कविता लिंबोरे प्राचार्य व्हि.डी विधाते.रावसाहेब भस्मे.प्रवीण मेहेत्रे. रणजित शिंदे.संदीप खाकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन.शेंडगे सर यांनी मानले.

Related Post