संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२३ऑगस्ट २०२४
प्रतिनिधि,
कै.पै .संजय योगीराज धालवडे यांचे गुरवार दि.२२ऑगस्ट रोजी दुपारी १: वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी दु.४वाजता तांदळी येथे देवनदी तीरावर्ती झाला. तांदळीच्या विकासामध्ये संजय धालवडे यांचा मोठा सिंहाचा वाटा होता ते नेहमी गोरगरिबाच्या मदतीला धावून जात नवरात्र उत्सवाच्या काळात ९ दिवस माता तुळजाभवानी मंदिर तांदळी दुमाला येथे उपवास धरून ते देवीची निस्सीम भक्ती करतअसायचे , अल्पशा आजाराने काही दिवसापासून ते पुणे येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते परंतु ईश्वरी सत्ते पुढे विलाज नाही अखेर त्यांची दुपारी १वाजता प्राणज्योत मालवली.
ते तांदळीचे कै. पै .माजी पंचायत समिती सभापती गुंगानाना धालवडे यांचे पुतणे कै.योगीराज धावडे यांचे चिरंजीव होते तसेच उपसरपंच राजेंद्र भोस यांचे ते दाजी होते. गावातील विकासात्मक जडनघडन मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.प्रत्येक कामामध्ये ते हिरीरीने सहभागी होत . त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे त्यांची पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे . ते फार विनोदी आणि खेळकर स्वभावाचे होते मागील काही वर्षापूर्वी ह भ प पद्माकर महाराज देशमुख यांनी मारुतीच्या सप्ताहामध्ये जे रामायण ७दिवस सादर केले त्यामध्ये श्रीरामाच्या भूमिकेमध्ये संजय धालवडे यांनी भूमिका साकारली होती. त्यांच्या अकाली जाण्याने तांदळी दुमाला मध्ये शोककळा पसरली असून तालुक्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक ३१/ ८/२०२४रोजी आढळगाव या ठिकाणी सकाळी ८वाजता होणार आहे..