संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदा
दि.३ऑगस्ट २०२४
लिंपणगाव (प्रतिनिधी)--न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या दरम्यान विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . या सप्ताहातला पहिला दिवस विद्यालयातील उपशिक्षिका लक्ष्मी बोलणे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी बांबूच्या काड्या पासून गणितीय साहित्य तयार केले .कार्डशिट पासून मुखवटे तयार केले ,टाकाऊ पासून टिकाऊ साहित्य बनविले इत्यादी शैक्षणिक उपयोगी साहित्य बनवण्याचे कार्य करण्यात आले. दिवस दुसरा विद्यालयातील उपशिक्षिका सुमती सुरसे यांनी प्रार्थनेला मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस याविषयी माहिती दिली. दिवस तिसरा विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाचे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
दिवस चौथा विद्यालयातील उपशिक्षक भगवान दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कलागुणांचे कार्यक्रम सादर करण्यात आले .
दिवस पाचवा. विद्यालयातील उपशिक्षक वैभव काळोखे यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचे फायदे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दिवस सहावा संतोष भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात इको क्लब स्थापन करण्यात आला तसेच शालेय पोषण आहार दिवस साजरा करण्यात आला. दिवस सातवा. रामदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्राध्यापक गणेश भोसले तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यान दिले. तसेच माजी लष्करी अधिकारी धनंजय मांडे यांनी विद्यार्थ्यांना सैन्य दलाच्या भरती विषयी मार्गदर्शन केले. शंकर यदलोड यांनी व्याख्यात्यांचे आभार मानले. अश्या पद्धतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे व पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.