संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे
दि.१९जुलै २०२४
..सैनिक विचारधारा..
कोणतीही व्यक्ति तुमच्या जवळ तीन कारणांमुळे येते... प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे.. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा, आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा...
हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, काहीच उपयोग नाही.
राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं, तिथे आपलं कोणी तरी असतं...!! भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु अभ्यास, चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहीजे.
काहीही न बोलता किती तरी सांगता येतं. वाणी आणि शब्द ह्यापेक्षा किती तरी पटीने मौनाचा शोध मोठा आहे.
ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत, तो तोडताना दहा वेळा विचार करतो, आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती.
निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होतं असते, जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या सुख आणि दुःखात धावून जात असते. जसं गुरूविना ज्ञान मिळू शकत नाही, तसं निंदकाशिवाय माणूस जीवनात प्रगती करू शकत नाही.
समीर खानोलकर कोल्हापूर