नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये फादर्स डे उत्साहात साजरा.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.१५जून २०२४

 लिंपणगाव (प्रतिनिधी)- तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे स्कूलमध्ये फादर्स डे अर्थात पितृ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पोलीस उपनिरीक्षक संपतराव कन्हेरे, यांनी भूषविले. प्रसंगी श्रुतिका पाचपुते, शरण्या पवार, संस्कृती नागवडे, ईश्वरी साबळे या विद्यार्थिनींनी मनोगताद्वारे वडीलांविषयी विचार व्यक्त केले.तर मा.मुख्याध्यापक सस्ते सर, जयदत्त साळुंखे, राम वाळके, संदीप डोळे या पालकांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शालेय प्रशासनाचे आभार मानले.


प्रसंगी मुलींनी पापा मेरी जान या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या. यावेळी पालकांसाठी रस्सीखेच संगीत-खुर्ची या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पालकांनी उत्स्फूर्तपणे खेळामध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला. आपल्या वडिलांना खेळताना पाहून सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक एस पी गोलांडे सर यांच्यासह मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रियंका नागवडे, प्रास्ताविक जयेश आनंदकर यांनी तर आभार गितोश्री मोहिते यांनी व्यक्त केले.

Related Post