श्री व्यंकनाथ विद्यालयात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत!

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.१५जून २०२४


      लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2024 -25 या शैक्षणिक वर्षाचे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे सदस्य अकबरभाई इनामदार हे होते. याप्रसंगी प्रार्थनेनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  इयत्ता  पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके व गुलाब पुष देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गोड पौष्टिक आहार देण्यात आला.


     यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य व माजी प्राचार्य बाळासाहेब शेंडे यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले की; या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होऊन विद्यालयाची; संस्थेची व गावाची मान उंचवावी. ज्यादा तासाच्या माध्यमातून शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; याबरोबरच विद्यार्थ्यांनी शालेय शिस्त अंगी बाळगावी; प्रत्येक सांघिक खेळामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असायला हवा; विद्यार्थ्यांच्या काही शालेय स्तरावर अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी तत्पर राहतील. निश्चितच दहावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा याहीवर्षी कायम राखली त्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचेही माजी प्राचार्य शेंडे यांनी कौतुक केले.


        याप्रसंगी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा स्कूल कमिटीचे सदस्य एम आर पवार; अकबर भाई इनामदार; आदींनी शैक्षणिक सुधार बाबीवर विद्यार्थी व शिक्षकांना काही मौलिक सूचना देत नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.


           याप्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष व नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे यावेळी म्हणाले की; विद्यार्थी हितासाठी आम्ही सदैव मार्गदर्शन तत्पर राहू; विद्यालयाच्या प्रलंबित असणाऱ्या संरक्षण भिंत व भौतिक सुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू; विद्यार्थ्यांनीही पुढील ध्येय निश्चितीसाठी जिद्द व चिकाटी अंगीकारावी निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल विद्यार्थी व सर्व सेवकवृंदाचे श्री काकडे यांनी कौतुक केले आहे. 


     यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संजय दळवी यावेळी शुभेच्छा पर भाषणात म्हणाले की; विद्यार्थ्यांनी अभ्यासात सतत वेळ द्यावा काही अडचणी असतील तर निर्भीडपणे शिक्षकांना सांगाव्यात; त्याचे निराकरण केले जाईल. स्कूल कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांचेही वेळोवेळी विद्यालयाला मार्गदर्शन लाभते. म्हणूनच शाळेचा गुणात्मक दर्जा देखील कायम आहे. विद्यार्थ्यांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता सतत अभ्यासात लक्ष द्यावे असे सांगून श्री दळवी यांनी नूतन वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


       यावेळी ग्रामपंचायत चे माजी सदस्य राहुल गोरखे; सुरेश कुदांडे विद्यार्थी; पालक; शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षक अविनाश कांबळे व ज्ञानदेव धायगुडे यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षक आनंदा पुराणे यांनी मानले.

Related Post