संघर्षनामा न्यूज lअहिल्यानगर
दिनांक १०जून २०२४
प्रतिनिधि,
निमगाव वाघा येथे कै.पै.किसन राव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय ५वे काव्य संमेलन २०२४ मध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामधे वाळुंज गावचं सामाजिक,धार्मीक व शैक्षणिक क्षेत्रामधे अग्रेसर कार्य करणारं व्यक्तीमत्व ज्ञानदिप विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहकले सर यांना जि.प. मा.सदस्य माधवराव लामखेडे यांचे हस्ते धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज पुरस्कारने गौरविण्यात आले.
या सन्मानाने माझी सामाजिक जबाबदारी वाढली असुन महापुरुषांच्या प्रेरणेने आणि आपल्या सर्वांच्या ताकतीने अविरत समाजसेवा करत राहील असे उदगार रोहकले सर यांनी काढले .
संस्थाअध्यक्ष पै.नानासाहेब डोंगरे पदाधिकारी समवेत विविध मान्यवरांच्या साक्षीने पुरस्कार स्विकारताना त्यांचे सहकारी देसाईसर ,शेवाळेसर, कोतकर सर ,जाधवसर बोडखे सर, तसेच वाळुंज ग्रामस्थ प्रा . जगन्नाथ हिंगे सर ,गारुडकर सर ,रावसाहेब शिंदे मेजर, बाजीराव दरेकर मेजर आदि मान्यवर उपस्थित होते.