संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे
दि.१०जून २०२४
लिंपणगाव प्रतिनीधी,
छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव सुद्रिक या शाळेच्या 1994- 95 या बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या शाळेचे फाउंडर शिक्षक मुख्याध्यापक श्री देशमुख सर हे होते . गेट-टुगेदर च्या या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी म्हणजेच प्राथमिक ते माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना बोलवून त्यांचे गुरुपूजन व मानसपूजा केली. त्यावेळी सर्व शिक्षक भारावून गेले.
सर्व शिक्षकांना ट्रॉफी नारळ शाल देऊन सन्मानित करण्यात आले . 29 वर्षानंतर भेटलेले सर्व मित्र मैत्रिणी यावेळी अतिशय भावूक झालेले होते. सर्वांनी आपली संघर्षमय कहानी या ठिकाणी विशद केली .सर्व माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या सर्व मित्रांची सुखदुःखाची सर्व चौकशी केली .सर्वांना गेट-टुगेदर च्या एकत्र येण्यामुळे खूपच आनंद झाला.
यावेळी प्राथमिक शाळेचे धुमाळ गुरुजी, मखरे गुरुजी अल्हाटबाई , अल्हाट गुरुजी, खराडे गुरुजी यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद विद्यालयाचे शिक्षक पवार सर ,घोंडगे सर ,देशमुख सर , तोंडे सर, भापकर सर, बोडखे सर व दरेकर मॅडम यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पवार सर व अशोक आळेकर हेही उपस्थित होते.
कार्यक्रम संपल्यानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांशी गप्पा मारत अतिशय आनंदाने हा दिवस साजरा केला. तसेच आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो .त्यामुळे शाळेसाठी सर्व मित्रांकडून एक सुंदर असे कपाट भेट देण्यात आले.
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा व गुरुजन सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी तन मन आणि धनाने खूप खूप असे सहकार्य केले.
गेट-टुगेदर च्या कार्यक्रमामुळे प्रत्येकामध्ये एक ऊर्जा निर्मिती झाल्यासारखे वाटले. तसेच वर्षातून एकदा तरी आपण एकत्र यावे अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली.