श्रेयवादाची कुरघोडी उघड केल्यावर कर्जत जामखेडच्या लोक प्रतिनिधींना राग का येतो?

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे

दि.२९मे २०२४

प्रतिनीधी, उज्वला उल्हारे 

  अहमदनगर करमाळा बाहय वळण झालेल्या गांवांच्या रस्त्यासाठी माझ्या प्रयत्नातुन २२ कोटी निधी प्राप्त झाला अशी धादांत खोटारडी गोष्ट प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध करून गाजावाजा करत श्रेय घेण्याचा कर्जत जामखेडचे लोक प्रतिनिधींचा प्रयत्न भाजपा कार्यकर्त्यांनी *लोणकढी थाप* म्हणत सत्य बाजू पुराव्या सहित लोकासमोर मांडून श्रेय घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला .....

      यासंदर्भातील माहिती घेतली असता परिवहन मंत्रालयाने ३० नोव्हेंबर १९७७ आणि १२ एप्रिल १९८२ साली एक पत्रक काढून राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळण रस्ता झालेल्या ठिकाणी त्या गावचा पूर्वीचा वहातुकीचा रस्ता हा त्या राष्ट्रीय महामार्गाचा भाग नसेल आणि त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी केंद्रसरकारची नसेल ती राज्यांची असेल आणि तो एक धोरणात्मक निर्णयाचा भाग असेल प्रसिद्ध केलेले आहे . परंतु राज्यांची आर्थिक कमतरता (Paucity of funds) लक्षात घेता एक वेळेस तो रस्ता केंद्राने दुरुस्त करून राज्यांना सुपूर्द करावा असा निर्णय केंद्राने घेतला . असे असताना आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या धोरणात्मक निर्णयाचा तो भाग असताना कर्जत जामखेडचे लोक प्रतिनिधी श्रेय घेण्यासाठी मी पत्र दिले म्हणतात . . जो धोरणात्मक निर्णय १९७७ व १९८२ ला झाला आहे त्याबद्दल तुम्ही २०२२ मध्ये पत्र देऊन काय साध्य होणार?  तुमचे श्रेय घेण्याची हौस आम्ही पुराव्या सहित खोडून काढली आहे . सदरचे N.H.A.I. कडील पत्रही प्रसिद्धी माध्यमात देत आहोत . भाजपा कार्यकर्त्यांना " *चोंग्यानो* " म्हणत तुम्ही तुमचा स्तर दाखवून दिला आहे . निवडून आल्यावर प्रा . राम शिंदे यांच्या घरी जाऊन फेटा बांधणे, विधीमंडळात पुस्तके वाटणे, स्वराज्य ध्वज यात्रा महाराजांच्या प्रतिमेशिवाय काढणे या सर्व नौटंकी होत्या पण तुमचे खोटारडेपणा उघड केल्यावर भाजपा कार्यकर्त्यांना शिव्याची लाखोली वाहणे हाच तुमचा स्वभाव आहे . तुमची सरंजामी वृत्ती नेहमीच उफाळून येते . कार्यकर्त्यांना गुलाम समजणे हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे पण भाजपा पक्ष  हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांचे आग्यामोहळ आहे आणि त्यांना असे डिवचाल तर ते चावल्या शिवाय सुटका करणार नाही अशा प्रकारचा इशारा भाजप तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी दिला.

    श्रेय घेण्याची नौटंकी उघडी पडत आहे म्हटल्यावर कर्जत जामखेडचे लोक प्रतिनिधी आणि त्यांच्या तथाकथित प्रसिद्धीची बाजू सांभाळणाऱ्या कंपनीचा संयम सुटला आणि भाजप कार्यकर्त्यांना शिव्याची लाखोली वाहणारी पोस्ट प्रसिद्ध करणेत आली . . .

   आ.रोहीत दादा पवार आपण लोक प्रतिनिधी आहात . तुम्हाला जे कागदपत्र श्रेय घेण्यासाठी उपलब्ध होतात तशीच ती समाजसेवक अण्णा हजारेंच्या माहिती अधिकार कृपेने इतरांनाही होतात . अण्णा हजारे वर साहेब आणि तुम्ही तसेही नेहमीच घसरता हा भाग अलहिदा पण आता त्यांच्या कामाचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे .

   कर्जत जामखेडचे लोक प्रतिनिधी स्वतःला आणि त्यांच्या शिल्लक गटाला महाराष्ट्राचे शिल्पकार कै .यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आणि आदर्श आहे असे म्हणतात मग राजकीय टीकाकारांना शिव्या देण्याचा आदर्श निश्चितच कै . यशवंतरावांचा होऊ शकत नाही कारण विनोदाचार्य प्र के . अत्रे यांचा किस्सा सर्वश्रुत आहे . अगदी निपुत्रिक म्हणून हिनवल्यावरही अत्रेंना पत्र लिहून पत्नीच्या शारीरीक आजारामुळे मूलं होऊ शकत नाहीत म्हणणारे यशवंतराव आणि फक्त खोटारडेपणा उघडा पडला, जनतेसमोर सत्य बाजू आली म्हणून लोक प्रतिनिधींना चोंग्यानो म्हणत शिव्याची लाखोली वाहणारे आ .पवार कोणता वारसा सांगतात? ...

                      बायडेन पासून ते वडापाव गाडी पर्यत निबंध लिहून मत मांडणारे कर्जत जामखेडचे लोक प्रतिनिधी खेद व्यक्त करून *प्रीतीसंगमावर आत्मक्लेश* करणार का? तसंही प्रीतीसंगमाला माफीचा धोबीघाट करणारे लोक प्रतिनिधी त्याचे पावित्र्य मानतात का? असा मार्मिक सवाल करत कर्जत जामखेडचे लोक प्रतिनिधी आणि त्यांच्या प्रसिद्धी कंपनीच्या न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नाचा दाव्यांचा नेहमीच पर्दापाश करून जशास तसे उत्तर सुसंस्कृतपणे देऊ , टीकाकार हा चांगला मार्गदर्शक असतो या संत तुकारामांच्या वचनावर आमचा दृढ विश्वास आहे . त्यामुळे विधायक शब्दात प्रतिवाद करु असा दावा भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी केला आहे . .

Related Post