संघर्षनामा वृत्तसेवा। श्रीगोंदा
दि.27 जाने. 2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी)- एसएससी बॅच 2004 च्या वतीने नेहमीच असे सुत्य उपक्रम राबवले जातात दहावी मध्ये असणाऱ्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून नेहमीच गावासाठी काही ना काही मदत करत असतात आज पर्यंत एसएससी बॅच 2004 ने श्री व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ यांना ग्रंथालयासाठी 21000 रुपयाची पुस्तके भेट दिली आहे ,त्याचप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यामध्ये नेहमीच गोरगरिबांना मदत करणारे अग्निपंख फाउंडेशन यांना 2100 रुपयाची मदत केली आहे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल यांना पेंग्विन डस्टबिन भेट दिली त्याबद्दल एसएससी बॅच 2004 च्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक श्री नवले सर व व्यंकनाथ विद्यालयाचे प्राचार्य श्री पुराने सर यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान केला तसेच पुढील काळात एसएससी बॅच 2004 च्या वतीने गावामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेसाठी पेंग्विन कुंड्या भेट देण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे त्यामुळे एसएससी बॅच 2004 सर्वांकडून कौतुक होत आहे.
भविष्यामध्ये अनेक उपक्रम राबवण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे.