संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१५जाने.२०२५
प्रतिनिधी,
मांजरी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शिवाजी उर्फ आबा मरीबा आदमाने(वय 74) यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा चार मुली नातवंडे जावयी असा मोठा परिवार आहे. शिवाजी आदमाने हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण कारागीर बलुतेदार सहकारी संस्थेचे प्रमुख नेते म्हणून कार्य करीत होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण कारागीर बलुतेदार होत करू बहुजन समाजातील लोकांना आधार देण्याचे काम आदमाने यांनी केले.
त्यांच्या जाण्याने राज्यांतील बलुतेदार संघाच्या न्याय हक्कासाठी लढणारा संघर्षनेता हरपला असून सामाजिक चळवळी मध्ये कधीही भरून निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली आहे.