संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२६डिसेंबर २०२४
प्रतिनिधी,
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचालित कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल व शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स स्कूल मध्ये आनंदी बाजार भरला.विद्यार्थांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे नफा व तोटा याचे गणित समजावे शेतकरी, कष्टकरी, आई वडील यांच्या कष्टाची जाणीव व्हावी या उद्देशाने तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदी बाजार चे आयोजन केले होते. यावेळी 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यामधे आपल्या शेतीत पिकवलेली भाजीपाला, विविध प्रकारचे खेळ, विविध प्रकारचे खाऊ चे दुकाने घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून सोनिया गांधी पोलीटेक्निकचे प्रिन्सिपल अमोल नागवडे उपस्थित होते. पालक संघाच्या वतीने रुपेश इथापे ,प्रवीणकुमार नागवडे व सौ.भापकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीतावर नृत्य सादर करून पाहुण्याचे स्वागत केले. तसेच पथनाट्य सादर करून नाताळ निम्मित सर्वांना शुभेच्या दिल्या.
यावेळी शाळेतर्फे उत्कृष्ठ व्यावसायिक बक्षीस देणेत आले. प्रथम क्रमांकाचा मानकरी भावेश खोसला हा ठरला,द्वितीय क्रमांक शरयू लोंढे व शिवज्ञा नागवडे या विद्यार्थिनींनी, तृतीय क्रमांक प्रज्वल ढवळे या विद्यार्थ्यांनी पटकावला.
यावेळी निरीक्षक एस.पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी, पालक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका नागवडे यांनी केले आभार प्रा.निगार सय्यद यांनी मानले.