अनुपस्थित अन्य खात्यातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार-अप्पर तहसीलदार श्री मुदगुल

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२६डिसेंबर २०२४

लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंद्यात 24 डिसेंबर रोजी श्रीगोंद्याचे अप्पर तहसीलदार प्रवीण मुदगुल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्राहक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते वास्तविक पाहता राष्ट्रीय व जागतिक ग्राहक दिनात दोन दिवस अगोदर ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पत्राद्वारे निमंत्रण देण्याची आवश्यकता होती. परंतु अचानक राष्ट्रीय ग्राहक दिनाचे निरोप देण्यात आल्याने ग्राहक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तर  तहसीलच्या पुरवठा विभागाने संबंधित सर्व खात्यातील अधिकाऱ्यांना उपस्थिती बाबत कळवून देखील अनुपस्थित राहिल्याने संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे अप्पर तहसीलदार श्री मुदगुल यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय ग्राहक दिनात घोषित केले. 

 दरम्यान ग्राहकांच्या हितासाठी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन तर 16 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन आयोजित करण्यात येतो. यावेळी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून या राष्ट्रीय व जागतिक दिनाचे आयोजन करण्यात येते. या दिनात ग्राहकांच्या विविध दैनंदिन व सामाजिक समस्या जाणून घेतल्या जातात. त्याचे निराकरण केले जाते. परंतु राष्ट्रीय ग्राहक दिनात पुरवठा विभागाने तालुक्यातील सर्व खात्यातील अधिकाऱ्यांना उपस्थितीबाबत निमंत्रण देऊनही अनेक खात्यांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने ग्राहकांची ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मात्र घोर निराशा झाल्याची चर्चा राष्ट्रीय ग्राहक दिनात उपस्थित ग्राहकांनी व्यक्त केली. प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम; पंचायत समिती; व वनविभाग इत्यादी तीनच खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम अप्पर तहसीलदार यांना काही मोजक्याच ग्राहकांच्या उपस्थितीत साजरा करण्याची वेळ येऊन ठेपली. या प्रश्न जनजागृती ग्राहक मंच ग्राहक पंचायत पदाधिकाऱ्यांनी या प्रश्न नाराजी व्यक्त केली. 

या अनुउपस्थित अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावणार असून; संबंधितांचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल; अशी माहिती अप्पर तहसीलदार प्रवीण मुद्गगुल यांनी उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन करताना केली. सध्या तालुक्यामध्ये ग्रामीणसह शहरी भागातील जनतेच्या अनेक समस्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयानुसार राष्ट्रीय व जागतिक ग्राहक दिनात समस्या उपस्थित झाल्यानंतर त्याचे निराकरण करता येते. परंतु या राष्ट्रीय ग्राहक दिनात अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने आता दहा ते पंधरा दिवसांमध्ये पुन्हा ग्राहक जनजागृती मंच व ग्राहक पंचायत पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून ज्या ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या आहेत; त्याच्यावर विचार मंथन करून तात्काळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील; असे आश्वासन अप्पर तहसीलदार श्री मुदगुल यांनी ग्राहक जनजागृती मंच पदाधिकाऱ्यांना यावेळी दिले. 

 दरम्यान ग्राहक संरक्षण कायदा 1986 रोजी पारित झाला. त्यामध्ये ग्राहकांची फसवणूक; तोटा; अटी; विक्रेता; कायदा; नियम या पार्श्वभूमीवर आपले अधिकार ओळखा ग्राहक हक्काचे भानराखा या अनुषंगानुसार तक्रार कोणाकडे करायची? याबाबत सविस्तर माहिती या कायद्यात पारित करण्यात आली. परंतु राष्ट्रीय ग्राहक दिनात तक्रारदाराच्या समस्या जाणून घेण्यासाठी संबंधित खात्याचे अधिकारीच उपस्थित राहत नसेल तर न्याय कसा? मिळेल असा सवाल देखील यावेळी ग्राहक जनजागृती मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अप्पर तहसीलदारांनी श्रीगोंद्यात पुन्हा लवकरच ग्राहक पंचायत व ग्राहक जनजागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक आयोजन करण्यात येणार असल्याचे अप्पर तहसीलदारांनी यावेळी उपस्थित त्यांना सांगितले. 

 या राष्ट्रीय ग्राहक दिनास जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर; पत्रकार पिटर रणसिंग ;पंकज गणवीर; ग्राहक जनजागृती मंचचे राज्य उपाध्यक्ष शरद नागवडे; खजिनदार दादासाहेब शिरवाळे; नंदू बगाडे; पांडुरंग रणसिंग स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे सतीश हिरडे युवराज बनसोडे; युवराज कुरुमकर; गोवर्धन वागस्कर आर बी वाळके; बाळू फराटे; पुरवठा निरीक्षक प्रज्ञा थोरात; मंडल कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी; गोडाऊन व्यवस्थापक गजानन बंडकर आदींसह ग्राहक संघटनांचे पदाधिकारी व ग्राहक यावेळी उपस्थित होते. आभार पुरवठा निरीक्षक प्रज्ञा थोरात यांनी मानले.

Related Post