संघर्षनामा न्यूज l नगर
दि.१६जून २०२४
प्रतिनिधि,
दि.१५/०६/२०२४ रोजी १७.०० वा. चे सुमारास पो. नि. प्रताप दराडे साहेब यांना रेल्वे पुलाजवळ, कायनेटीक चौक, अहमदनगर येथे एक इसम हातामध्ये कोयता घेवुन शरीरा विरुध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. पो.नि. प्रताप दराडे साहेब यांनी तात्काळ पोहेकॉ/१२१२ ए पी इनामदार व पोकॉ/३६५ सचिन लोळगे, पोकॉ/३५६ शिवाजी मोरे, पोकॉ/ ४२ शरद धायगुडे यांना केबीनमध्ये बोलावुन बातमीतील हकीगत सांगुन तात्काळ सदर ठिकाणी जावुन कारवाई करा असे सांगितल्याने आदेशाप्रमाणे पोहेकॉ/१२१२ ए पी इनामदार हे पोलीस स्टाफ व पंचासह बातमीतील नमुद ठिकाणी गेले. सदर ठिकाणी परीसरामध्ये कोयता घेऊन फिरत असलेल्या इसमाचा शोध घेतला असता १७:४५ वा चे सुमा. रेल्वे उड्डाणपुलाचे बाजुला लक्ष्मी रो हाऊसींग सोसायटि कडे जाणारे रोडवर एक इसम त्याचे हातामध्ये एक कोयता घेऊन उभा असलेला दिसला असता त्यास जागीच पकडुन पोहेकों / इनामदार यांनी पोलीसांची व पंचांची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता. त्याने त्याचे नाव अक्षय भगवान खंडागळे वय- २४ वर्षे, रा- अचाणक चाळ, रेल्वे स्टेशन, अहमदनगर असे सांगितले त्यास पंचा समक्ष त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात धारदार लोखंडी कोयता. मिळुन आल्याने पोहेकॉ/ इनामदार यांनी पंचासमक्ष नमुद मुद्देमाल जप्त केला. नमुद इसमास कारवाईकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेवुन आले. पोकॉ/३६५ सचिन लोळगे यांचे फिर्यादी वरुन नमुद आरोपीता विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं-७०३/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो. मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे सो., मा. उप विभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग श्री. अमोल भारती सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोहेकॉ ए. पी. इनामदार, पोकों/ दिपक रोहकले, तान्हाजी पवार, सत्यम शिंदे, सुरज कदम, सचिन लोळगे, सुजय हिवाळे, शरद धायगुडे, शिवाजी मोरे यांनी केली आहे.