श्री तांदळेश्वर माध्यमिक विद्यालयाची कु.श्रद्धा धावडे 94%गुण मिळवून प्रथम..

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे

दि.५जून २०२४

श्रीगोंदा ,

श्रीगोंदा तालुका ग्रामीण विकास व शिक्षण संस्थेचे श्री तांदळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा एस .एस .सी 2024 चा निकाल100% लागला असून विद्यालयाची कु.श्रद्धा श्रीकृष्ण धावडे  94% गुण मिळवून केंद्रात  प्रथम तर कु.आर्या शरद शेळके 93.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु. गौरी सतीश बोरुडे 90.60% मार्क्स मिळवून केंद्रात पाचवा क्रमांक आला आहे .

जाधव राजकुंवर युवराज 88.60% गुण मिळवून चौथा क्रमांक आला आहे तर जाधव पृथ्वीराज अशोक 88.00% पाचवा क्रमांक आला आहे. 

विद्यालयात 51 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत 15 विद्यार्थी विशेष प्राविण्य व 17 विद्यार्थी ग्रेट 1 मध्ये व 14 विद्यार्थी ग्रेट 2 मध्ये तर 5 विद्यार्थी पास ग्रेट मध्ये यश संपादन केले आहे तसेच विद्यालयाचा एन एम एस परीक्षेत सुद्धा 13 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत या गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री साळवे सर वर्ग शिक्षक दरेकर डी एस, भगत सर, चांडे सर ओव्होळ सर ,जगताप सर ,खताळ सर, बोरुडे सर सर्व सेवकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार बबन दादा पाचपुते ,युवा नेते प्रताप भैय्या पाचपुते ,सचिव कुंडलिकराव भोसले ,सरपंच संजय आण्णा निगडे, उपसरपंच राजेंद्र भोस स्कूल कमिटी अध्यक्ष बापूसाहेब शेळके, माजी चेअरमन हौसराव बोरुडे,चेअरमन संजयराव शेळके जिजाऊ उद्योग समूहाचे संचालक संदिपशेठ रोडे वआधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे व्हा.चेअरमन सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व समस्त ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Related Post