श्रीगोंदा तालुक्यात कुकडी लाभक्षेत्रात पाण्याअभावी अनेक गावे तहानलेली .

संघर्षनामा न्यूज़।श्रीगोंदा 

दि .२जून २०२४

   नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यात उन्हाळी हंगाम अंतिम टप्प्यात येत असतानाच पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. मेहरबानी म्हणून कुकडीचे आवर्तन  30 मे पासून सोडण्यात आलेले आहे. अन्यथा सर्वांनाच पाणी पाणी करण्याची वेळ येऊन ठेपली असती. असो सद्यस्थितीला कुकडीचे आवर्तन चौदाशे क्युसेस ने सोडण्यात आलेले असून; धरणापासून हे आवर्तन 78 किलोमीटर पर्यंत पोहोचले आहे. अशी माहिती कुकडीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार टेल टू हेड असे धोरण आवर्तन कालावधीत राबवले जात असल्यामुळे श्रीगोंदेकरांना किमान आठ दिवस आवर्तन ची वाट पाहावी लागेल; असे चित्र तूर्त तरी दिसून येत आहे.  प्रथम हे आवर्तन कर्जत करमाळ्याकडे मार्गस्थ होणार आहे.. मात्र मागील आवर्तनात श्रीगोंदेकरांना फक्त सहा दिवसच कसेबसे आवर्तन मिळाल्याने उन्हाळी पिके फळबागा याबरोबरच पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय जटिल बनला आहे. त्यामध्ये मांडवगण गटात अतिशय पिण्याच्या पाण्याची दुर्मिळ अवस्था निर्माण झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. हंडाभर पाण्यासाठी या भागांमध्ये ग्रामस्थ महिलांची भटकंती सुरू असल्याचे दिसून येत आहे.


          सद्यस्थितीला मिळालेल्या माहितीनुसार उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात विशेषता कुकडी लाभ क्षेत्रात हंडाभर पाण्यासाठी सर्वांचीच भटकंती सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही गावांना तालुका प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असल्याचे दिसते. पाऊस लवकर सुरू झाला तरच पिण्याचा पाण्याचा प्रश्न शिथिल होऊ शकतो; अन्यथा पाण्याची मोठी सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. असेच चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यां कडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथम गावोगावी कुकडी लाभ क्षेत्रात जिल्हा प्रशासनाकडून यादीनुसार गाव तलाव भरून घेतले जाणार आहेत. नंतर शेती पिकांसाठी हे पाणी असणार आहे. कारण गावोगावी गाव तलाव व बंधारे आणि अभावी कोरडी पडल्याने जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे प्रथम गाव तलाव भरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कुकडीचे आवर्तन हे पाऊस पडेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे देखील कुकडीचे कार्यकारी अभियंता श्री वाळके यांनी सांगितले. साधारणता तीन-चार दिवसांमध्ये मेघराज्याचे आगमन होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता अत्यंत तीव्र स्वरूपाची असल्याने आहे; त्या पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे जलसाठा देखील संपुष्टात आल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.


 श्रीगोंदा तालुक्यात अनेक फळबाग आहेत; त्यामध्ये प्रामुख्याने पारगाव सुद्रिक; लोणी व्यंकनाथ; बेलवंडी व इतर अन्य गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फळबाग आहे. अनेकांची उपजीविकाही फळबागांवर अवलंबून आहे. परंतु जलसाठा संपुष्टात आल्याने या फळबागा देखील अंतिम घटका मोजत आहेत. मागील आवर्तन कालावधीत श्रीगोंदेकरांना तुटपुंजे आवर्तन मिळाल्याने उन्हाळी हंगामातील पिकांचे उत्पादनही घटले गेले आहे. पाणी प्रश्नही तीव्र बनला गेला आहे. तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात कमी आवर्तन मिळाल्याने तालुका प्रशासनाला शेतकरी नेते व शेतकऱ्यांनी घेराव घालून आवर्तन संदर्भात खडे बोल सुनावले गेले. परंतु निवडणुकांचे आचारसंहिता व निवडणुकांसाठी अनेक कर्मचाऱ्यांच्या नेमणुका झाल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना तर बसलाच परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील अतिशय गंभीर बनला गेला आहे. श्रीगोंदा तालुक्याच्या पर्जन्यवृष्टी संदर्भात सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना समक्ष भेटून कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना व्यक्त करत  उभी पिके; फळबागा व पिण्याच्या पाण्या संदर्भात तातडीने आवर्तन सोडण्यासंदर्भात निवेदन सादर केले. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी देखील तहसील कार्यालयासमोर कुकडीच्या आवर्तन संदर्भात एक दिवशी धरणे आंदोलन करून तालुका व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जातीने लक्ष घालून तातडीने कुकडीच्या आवर्तनासंदर्भात  30 मे पासूनच कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात कुकडी लाभक्षेत्रात निश्चितच या आवर्तनचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी शेवटच्या शेतकऱ्यांना आवर्तन मिळण्या कामी जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे देखील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

Related Post