संघर्षनामा न्युज lश्रीगोंदा
दिनांक ३० मे २०२४
प्रतिनीधी,
समाजातील जातीय विद्वेष मिटवण्यासाठी व सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी , स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार समाजात रुजणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शाहीर अण्णाभाऊ साठे व स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक , व्याख्याते, प्राध्यापक डॉक्टर धनंजय भिसे पुणे यांनी आपल्या व्याख्यानात प्रतिपादन केले.जयस्तुते सोशल फाउंडेशन श्रीगोंदा यांच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते..आपल्या व्याख्यानात डॉ. भिसे पुढे म्हणाले की , देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकरांचा व त्यांच्या विचारांचा जाणीवपूर्वक उपहास केला गेला. वास्तविक प्रखर राष्ट्रभक्ती , राष्ट्रप्रेम त्यांनी भोगलेली काळया पाण्याची शिक्षा , अंदमानच्या कारागृहात ब्रिटिशाकडून झालेला अत्याचार कल्पनेपलीकडचा होता. तरीदेखील सावरकरांनी आपल्या लेखणीतून साहित्य ,नाटके ,काव्य निर्माण केले , प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्यातली जिद्द चिकाटी न सोडता , सामाजिक ,वैज्ञानिक, अर्थविषयक , तसेच जातीभेद संपवण्याच्या दृष्टीने तर्कशुद्ध विचार मांडले .ते विचार समाजासाठी आजही तितकेच उपयुक्त असून अभ्यासन्याची आवश्यकता आहे. विशेषतः देशातील तरुणांनी सावरकर अभ्यासलेच पाहिजेत असे आग्रही प्रतिपादन डॉक्टर भिसे यांनी केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्री हिराकांत रामदासी हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून प्राणीमित्र डॉक्टर शिवाजी पवळ हे होते, प्रमुख उपस्थिती ,परिक्रमा संकुलच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते यांची लाभली. डॉक्टर पवळ यांनी आपल्या मनोगता मध्ये , बोलताना सांगितले की ,देशातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी सेंद्रिय शेती व देशी गाई यावर काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉक्टर पवळ यांनी केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रामदासी म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर ,लोकमान्य टिळक, छत्रपती शिवराय, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, यांनी जे समाजासाठी कार्य केले , ते समजून घेऊन अनुकरणात आणण्याची आज नितांत आवश्यकता आहे. तेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज करत असून सुसंस्कारित व्यक्ती निर्माण झाल्यास ,अनेक समस्या आपोआप संपुष्टात येतील. व म्हणूनच राष्ट्रभक्त व्यक्ती निर्माना चे कार्य संघ करतो आहे. यावेळी परिक्रमा संकुलच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मानवी आरोग्यासाठी यापुढे सेंद्रिय अन्नधान्य फळे भाज्या यांचा वापर तसेच देशी गायीची सेवा व देशी गाईचे दूध महत्वाचे राहील असे सांगितले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयस्तुते सोशल फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभांगीताई सप्रे यांनी केले. यावेळी मान्यवरांचा यथोचित परिचय व सत्कार श्री संदीप घोडेकर ,विजय सप्रे व प्रा.श्री. संदीप चौधरी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राधेश्याम कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावरकर जयंती उत्सव समिती सदस्य सर्वश्री. संदीप घोडेकर प्रा.संदीप चौधरी , श्री.दादासाहेब सप्रे, श्री.शिवाजी साळुंखे (वि.ही.प. जिल्हा सहमंत्री ) , श्री.प्रसाद टकले, श्री.विजय सप्रे , श्री.निखिल श्री.भागवत, श्री.कालिदास कोथिंबीरे , श्री.अमोल हिरणवाळे, श्री.प्रतीक गायकवाड, श्री.सुशांत काळे, श्री.विजय डहाळे, श्री.अरविंद कासार, श्री.दादासाहेब दळवी, श्री.अनिलराव ससाने, श्री.राजेश्वर श्रीराम,श्री. श्री.अविनाश दीक्षित ,श्री. शांताराम वाबळे ,श्री.सुभाष वाखारे, श्री.शुभम लाढाने , भारत खेतमाळीस यांच्यासह विधीज्ञ श्री. मदनंत फडणीस, नितीन कुलकर्णी काळाने तसेच अविनाश फराटे , प्राध्यापक बाळासाहेब बडे, डॉक्टर नितीन खामकर यांच्यासह अनेक मान्यवर महिला व पुरुष कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन व संपूर्ण वंदे मातरमने भारावलेल्या वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला.