भानेश्वर विद्यालयात स्नेह मेळावा संपन्न..

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे

दि.२५मे २०२४

प्रतिनीधी,

भानगावचे सुपुत्र दत्तात्रेय रामदास नवले  (उपजिल्हाधिकारी पनवेल) यांनी त्यांच्या इयत्ता दहावीतील मार्च 1998 च्या बॅच मधील विद्यार्थ्यां समवेत घेतला विद्यार्थी दशेतला आनंद.

भानगावच्या यात्रेनिमित्त मित्रांबरोबर एकत्र आले असतांना शाळेची आठवण काढत शाळेत जाऊन लहानपणीचा भानेश्वर विद्यालयातील विद्यार्थी असलेला आनंद घेण्याचे ठरले.त्यानुसार शुक्रवार दिनांक 24.05.2024 रोजी विद्यालयात मित्र मैत्रिणी समवेत बेंचवर बसून जुन्या आठवणींना उजाळा देत मनमुराद आनंद लुटत लहानपणीच्या विश्वात रममाण झाले. प्रत्येकांनी आपण करीत असलेला व्यवसाय, कौटुंबिक परिस्थिती तसेच सामाजिक कार्य विषद करून एकमेकांशी संवाद साधला. सूत्रसंचालन श्री.दत्तात्रय बाबासाहेब शितोळे सर यांनी केले.विद्यालयाच्या वतीने प्राचार्य श्री.विश्वनाथ शेलार सर व श्री.केशवराव मोढवे सर यांनी मार्गदर्शन करून आभार व्यक्त केले. यावेळी विद्यालयात माजी सेवक व कुकडी कारखान्याचे संचालक श्री.अशोकराव धोंडीभाऊ शितोळे व ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री.धारकर सर उपस्थित होते.  यावेळी उद्योजक दिलीपराव नवले,गणेश महाडिक, अजिनाथ थोरात, अमोल औटी,संतोष चव्हाण, संतोष महाडिक, गौतम टकले, संतोष आघाव, संपत महाडिक, ज्ञानदेव महाडिक, शशिकांत मोटे, जयवंत शितोळे, अनिल कुदांडे, कल्याण गोरे, मधुकर महाडिक, नंदकुमार कुदांडे, शिवाजीराव कुदांडे,जयसिंग कुदांडे, भगवान वारे,संतोष तोरडमल आबासाहेब कुदांडे, सौ.पुनम फंड (साबळे),सौ.प्रतिभा नलगे (शितोळे),सौ.छाया कुदांडे (गोरे),सौ.सुरेखा देशमुख (शेलार),सौ.शितल शिंदे (सुरनर)हे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते.तब्बल 25 वर्षानंतर हे सर्व सवंगडी एकत्र आले होते. हे सर्व एकत्र येण्यासाठी शिवाजी कुदांडे मेजर यांनी विशेष प्रयत्न केले. शेवटी छाया कुदांडे (गोरे) मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.विद्यालयाच्या यशात व जडणघडणीत संस्था, ग्रामस्थ व सर्व माजी विद्यार्थ्यांचे लाखमोलाचे सहकार्य व योगदान आहे.

Related Post