तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार :- प्रा.गणेश भोसले

संघर्षनामा वृत्तसेवा l कर्जत 

दि.१सप्टेंबर २०२४

प्रतिनीधी,उज्वला उल्हारे 

मिरजगाव:- येथील महात्मा फुले नूतन महाविद्यालयामध्ये दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी वांग्मय मंडळ उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणादायी व्याख्याते प्रा. गणेश भोसले उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी जीवनामध्ये असंख्य संधी येतात त्या ओळखून संधीचं सोन करण आपल्याच हातात असते, स्वतःला ओळखून ध्येयाचा पाठलाग करून जीवनात यशस्वी होता येते. जी माणसे वेळेला महत्त्व देतात ती जीवनात यशस्वी होतात, कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार असे मत व्यक्त केले.

           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. चंद्रकांत मंडलिक हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ध्येय, जिद्द, चिकाटी व कष्टाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. आप्पा माने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भूषण तागड यांनी तर आभार प्रा. डॉ. तानाजी जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Post