स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई..

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१४ जाने.२०२५

प्रतिनिधी,

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी सुनिल पुंडलीक उमाप, साईनाथनगर, नेवासा, ता.नेवासा हे दिनांक 01/01/2025 रोजी सायंकाळी 06.30 वा. सुमारास शेतात मजुरीचे काम करून श्रीरामपूर ते नेवासा रोडने फोनवर बोलत चालत असताना अज्ञात आरोपीतांनी मोटार सायकलवर येऊन, त्यांचा मोबाईल, रोख रक्कम जबरीने घेऊन गेले. याबाबत नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 05/2025 बीएनएस कलम 309 (4) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. 

मा.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना जिल्हयातील जबरी चोरीचे ना उघड गुन्हे उघडकिस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व  अंमलदार मनोज गोसावी, संदिप दरंदले, जालींदर माने, रमीजराजा आत्तार, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे अशांचे पथक नेमूण गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले होते.

दिनांक 13/01/2025 रोजी तपास पथक नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल माहिती घेऊन, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपासामध्ये इसम नामे अक्षय गांगुर्डे, रा.श्रीरामपूर यास निष्पन्न केले. पथकाने आरोपीचा राहते घरी शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) अक्षय दादासाहेब गांगुर्डे, वय 28, रा.संजयनगर, श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा 2) सुभाष उर्फ भावडया दिलीप शिंदे, रा.बहीरवाडी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर व इतर एक अनोळखी ( फरार )यांचेसह केल्याची माहिती सांगीतली. 

पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे गुन्हयात चोरीस गेलेल्या मोबाईलबाबत विचारपूस केली असता, आरोपीने गुन्हयांतील मुद्देमाल त्याचे राहते घरातुन काढुन दिल्याने तो पंचासमक्ष हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहे.  

 सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Post