संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१४ जाने.२०२५
प्रतिनिधि,
राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता जिजाऊ माँसाहेब व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे व्यासपीठावरील सेवक वृंदांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता सातवी क च्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भगवान दिघे यांनी आपल्या बहारदार शैलीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या हिंदू धर्म वाचविण्यासाठी व वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती दिली.
तसेच विद्यालयातील इयत्ता सातवीच्या सार्थक मांडे. आदित्य पवार ,सिद्धांत पवार ,निगडे संस्कार, ऋषी झिटे, आदिराज सुपेकर ,पांगरकर सोहम, सोहम इंगळे , रोडे हर्षल कुताळ संभव , शिंदे अनिरुद्ध या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ही आपली दैवते आहेत .आज त्यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवार ए.एल. यांनी व्याख्यान देताना नमूद केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक हौसराव दांगडे ,काकासाहेब मांडे, प्रकाश राव रोडे ,रामदास पवार, कदम मीनाक्षी कदम,राजेंद्र शेळके , विठ्ठल लेंडे , संतोष भोईटे, अंकुश कोकाटे, वैभव काळोखे ,प्रणव नलगे ,इंगळे मामा त्याचप्रमाणे लक्ष्मी बोलणे,अर्चना कोरडे, सुमती सुरसे, महादेवी माने, रोशनी भवार व स्नेहल धुमाळ आधी उपस्थित होते. अत्यंत दिमाखदार आणि नियोजनबद्ध रीतीने साजऱ्या झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आवारे साईराज व पारखे सार्थक या विद्यार्थ्यांनी तर आभार नगरे आर्यन या विद्यार्थ्यांनी मानले .