संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे
दि.१ऑगस्ट २०२४
प्रतिंनिधी,
आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होतो त्या पाठीमागे बऱ्याच लोकांचे नकळत योगदान असते.
ही गोष्ट आपण कधीही विसरू नये.
आपण सर्वांना मी एक संदर्भा द्वारे हे समजविण्याचा प्रयत्न करीत आहे.
हा लेख थोडा मोठा आहे.
परंतु यामधून एक लीडर ला बऱ्याच काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत.
अमेरिका आणि व्हिएतनामचे युद्ध चालू होते.
या युद्धामध्ये चार्ली प्लंब नावाचा एक जेट विमानाचा पायलट होता.
त्यांनी युद्धामध्ये 75 यशस्वी उडाने केली होती.
आता त्याला निवृत्त होण्यासाठी फक्त पाच दिवस बाकी होते.
आणि जेट फाइटर चे शेवटचे उडान त्याला करायचे होते.
त्यानंतर तो सेवानिवृत्त होऊन अमेरिकेला जाणार होता.
परंतु त्याचे दुर्दैव असे होते की, या शेवटच्या उड्डाणामध्ये त्याच्या फायटर ला जमिनीवरून मारा करणाऱ्या मिसाईलने गाठले. त्याच्या फायटर ला आग लागली. चार्ली प्लंब यांनी जेट फायटर मधून पॅराशुट ने जंप केला.
परंतु दुर्भाग्यवस तो दुश्मन च्या एरियामध्ये उतरला.
तिथे त्याला दुश्मनाने कैद केले.
चार्ली प्लंब यांना सहा वर्षाची शिक्षा झाली.
त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर ते अमेरिकेमध्ये गेले.
एके दिवशी ते एका हॉटेलमध्ये बसले होते.
तेंव्हा त्याच्यासमोर एक व्यक्ती बसला होता.
तो त्यांना एकसारखा टक लावून पहात होता.
प्रथम त्यांनी त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले.
परंतु नंतर समोरचा व्यक्ती स्वतः उठून चार्ली प्लंब यांच्याकडे गेला.
त्यांच्याबरोबर हात मिळविला.
त्यांना विचारले, अमेरिका आणि व्हिएतनामच्या युद्धामध्ये तुम्ही जेट फायटरचे पायलट होता. तुमच्या फायटर प्लेन चा अपघात झाला होता.
तुम्ही पॅराशुटच्या मदतीने खाली उतरला होता.
तुम्हाला दुश्मनाने कैद केले होते.
एवढे ऐकल्यानंतर चार्ली प्लंब एकदम अचंबित झाले.
त्यांनी त्या व्यक्तीला विचारले. तुम्हाला एवढे सर्व कसे माहित आहे?
यावर त्या व्यक्तीने नम्रपणे उत्तर दिले.
ज्या पॅराशुटने तुम्ही जेट फायटर मधून जंप केला होता.
तो पॅराशुट चेक करून मीच पॅक केला होता.
त्या व्यक्तीच्या तोंडामधून एवढे बोल ऐकल्यानंतर चार्ली प्लंब एकदम भावुक झाले.
त्यांच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहवु लागल्या.
त्यांनी त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारली.
कारण त्या व्यक्ती ने पॅक केलेल्या पॅराशुट मुळेच ते आज जिवंत होते.
मित्रांनो, यामध्ये तात्पर्य असे आहे की, आपल्या जीवनामध्ये नकळत कोणीतरी आपली मदत करीत असतो.
तुम्ही त्यांना कधीही विसरू नका.
आपल्या यशामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा असतो.
त्यांना देखील त्याचे श्रेय मिळाले पाहिजे.
कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये असेच कुणीतरी तुमच्यासाठी पॅराशूट पॅक करीत असतात.
जीवनामध्ये जे यशस्वी होतात.
ते यश त्यांच्या एकट्याचे नसते.
तर त्यामागे अप्रत्यक्ष रूपाने इतरांचे देखील योगदान असते.
फरक एवढाच आहे की, ते तुम्हाला दिसत नाहीत.
अशा व्यक्तींना शोधा!
ते तुमच्या आजूबाजूलाच असतात.
तुम्ही जेव्हा संकटामध्ये असतात.
तेव्हा ते गुपचूप तुमची मदत करून जातात.
अशा लोकांना ओळखा!
त्यांचे आभार मानायला विसरू नका.
लक्षात ठेवा!
तुमच्यासाठी ज्यांनी पॅराशुट पॅक केले होते, वेळ आल्यानंतर त्यांच्यासाठी देखील तुम्ही पॅराशूट पॅक करा.
दुसऱ्यांना यशस्वी होण्यासाठी मदत करा.
तुम्ही कुणाची जर गुपचूप मदत करून, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल केला.
तर यासारखे सुंदर दुसरे कोणतेही कार्य नाही.
केवळ स्वतःलाच हिरो बनवु नका साहेब...!!
तर दुसऱ्यांना देखील हिरो बनविण्यासाठी प्रयत्न करा.
याचे एक उदाहरण तुम्हाला पहायला मिळते.
भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशाने क्रिकेटचा विश्वकप जिंकला होता.
त्यावेळी कॅप्टन धोनी यांनी ट्रॉफी स्वीकारल्यानंतर ती ट्रॉफी संघामधील दुसऱ्या खेळाडूंना सोपविली होती.
आणि तो संघाच्या पाठीमागे उभा राहिला होता.
हेच एक चांगल्या लीडरचे लक्षण आहे.
आपण त्यांचे अनुकरण केले पाहिजे.
कारण ट्रॉफी जिंकण्यामध्ये सर्व खेळाडूंचे योगदान होते.
त्याचे श्रेय सर्वांना मिळायलाच पाहिजे.
बऱ्याच माणसांची मानसिकता अशी असते की, सारे श्रेय स्वतःलाच मिळाले पाहिजे.
परंतु जो खरा लीडर असतो.
तो यशाचे श्रेय सर्वांना देत असतो.
यामधून तुम्ही काय शिकला...!!
आतापर्यंत तुम्ही कुणाचे पॅराशुट बनले आहेत का?
आत्तापर्यंत बनले नसाल तर, आता जरूर कुणाचा पॅरॅशूट बना.
मा.सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर