संघर्षनामा न्यूज़। श्रीगोंदा
दि. 6ऑक्टोबर 2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव अंतर्गत असणारी मुंढेकरवाडी येथील युवकांनी समस्यानभूमी मधील विविध कामांंबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेमध्ये विकास कामास संदर्भात ठराव होऊन देखील सामाजिक कामाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली नसल्याकारणाने मुंढेकर वाडीचे युवक कार्यकर्ते योगेश चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर यांनी शुक्रवारी 6 ऑक्टोबर पासून मुंढेकर वाडीच्या समस्यानभूमीमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाचा पहिलाच दिवस असल्याने लिंपणगाव व मुंढेकरवाडी येथील अनेक युवकांनी व ग्रामस्थांनी या उपोषणाला प्रामुख्याने बी आर एस एस चे टिळक भोस, मेजर प्रकाश चव्हाण, निलेश कुरुमकर, माजी सरपंच अरविंद कुरुमकर, विजय कुरुमकर, कमलेश गुंजाळ, हनुमंत कुरुमकर, अजित चव्हाण, संतोष जाधव, तात्या कणसे, आबा लोखंडे, बबन कुरुमकर, सतीश भगत आदींनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला आहे.
दरम्यान उपोषण करते योगेश चव्हाण व किरण कुरुमकर यांनी गटविकास अधिकारी व संबंधितांना पाठवलेल्या निवेदनात जवळपास आठ प्रमुख विकास कामांच्या मागण्यांची ग्रामपंचायत प्रशासनाने विना विलंब कार्यवाही करावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उपोषण दरम्यान पंचायत समितीचे कक्षा अधिकारी डीडी समुद्र ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी श्री धायगुडे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या पंधरा दिवसात मार्गी लावण्यात येईल. असे आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
या लेखी आश्वासनामध्ये मुंढेकरवाडी येथील स्मशानभूमी येथे पंधरावा वित्त आयोग सन 2022- 23मुंढेकरवाडी, खोडवेवस्ती, कासारपत्रावस्ती, जाधव वस्ती, समशानभूमी हातपंप घेणे, या कामासाठी दोन लाख 40 हजार तरतूद करण्यात आलेली आहे. 2023 24 मध्ये वार्ड क्रमांक सहा मध्ये गटार लाईन करणे, हे काम प्रास्तावित आहे. त्यासाठी चार लाख रुपये इतकी तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे उपोषणकर्त्यांनी सुचविलेनुसार जन सुविधा योजनेअंतर्गत नवीन आरसीसी स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे देण्यात येईल. तसेच समशानभूमीमध्ये लाईट बल्बची सुविधा करण्यात येईल. पंचक्रोशीमध्ये सर्व ठिकाणी विविध योजना अंतर्गत झालेल्या विकास कामांचा बोर्ड लावण्याचे सुचविले होते, त्याची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल. स्ट्रीट लाईट बसविणे वार्ड क्रमांक सहा सात वार्ड नंबर सहा मधील बंद बल्ब नवीन बसविण्यात येतील. यादी लेखी स्वरुपात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना कळविले असल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले असल्याचे उपोषण करते योगेश चव्हाण व किरण कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.