परिक्रमा शैक्षणिक संकुल कोविड १९ मध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व परिक्रमा स्वीकारणार – आ. बबनराव पाचपुते

काष्टी | संघर्षनामा न्युज

अजनूज प्रतिनिधी  - श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघातील , कोविड -१९ महामारित अनाथ झालेल्या, अथवा आई किंवा वडील गमावलेल्या  दहावी व् बारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्रमा शैक्षणिक संकूल मदतीचा हात देणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोना आपत्ती मध्ये मृत्युमुखी पडले आहेत अश्या विद्यार्थ्यांना खचून जाऊ नये. असे अवाहन आमदार बबनराव पचपुते यांनी केले आहे.

कोरोना महामरिच्या काळात अनेक लोक मृत्युमुखी पडले , अनेक कुटुंब उधवस्त झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे  अतोनात नुकसान झाले. या कोरोना महामारीमुळे अनेकांच्या डोक्यावरचे छत्र हरपले. दहावी व् बारावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचे पालक अश्या महामारीत मृत्यु पावले आहेत अश्या विद्यार्थ्याना अभियांत्रिकी पदवी व् पदविका अभ्यासक्रमासाठी परिक्रमा शैक्षणिक संकुलामध्ये शैक्षणिक फी घेतली जाणार नसल्याचे पाचपुते यांनी सांगितले. कोरोनाच्या दुःखामुळे  कोणाही विद्यार्थ्यांचे इंजिनिअर बनन्याचे स्वप्न अपूर्ण रहू नये म्हणून अश्या आपत्तिग्रस्त विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीचे शैक्षणिक पालकत्व परिक्रमा स्वीकारणार आहे.

या विषयी बोलताना संस्थेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह पाचपुते यांनी सांगितले की, परिक्रमाची स्थापनाच मुळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी झाली. परिक्रमाच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांनी डिप्लोमा , इंजिनिअरिंग, फार्मसी , व्यवस्थापन शास्त्र तसेच सी बी एस इ  अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील विद्यार्थ्यांसह राराज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी परिक्रमा मध्ये प्रवेश घेतात. आजपर्यंत परिक्रमाच्या  अनेक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवा , रेल्वे बोर्ड, राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, सैन्य दल इ. शासकीय आस्थापनांमध्ये संधी मिळवली आहे. तर अनेक नामवंत बहुराष्ट्रीय आय .टी , फार्मासुटिकल, इन्फ्रास्ट्रक्चर , टेलिकॉम ई कंपनी मध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. 

परिक्रमा शैक्षणिक संकुलामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात  मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर , मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल , सिव्हिल ई अभियांत्रिकी पदवीका व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दहावी नंतर डिप्लोमा  तसेच बारावी सायन्स नंतर थेट इंजिनियरिंग डिग्री ला प्रवेश उपलब्ध आहे. आपत्तिग्रस्त गरजू विद्यार्थ्यांनी परिक्रमा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिक्रमा महाविद्यालयात दहावी व बारावी नंतरच्या विविध प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

Related Post