कर्जत | संघर्षनामा न्युज
प्रतिनिधी - कर्जत तालुक्यातील कौडाने गावात आपल्या गावचे नवनिर्वाचित कामगार तलाठी श्री अभिजित शेलार यांचा मानवाधिकार अभियान चे जिल्हाध्यक्ष श्री अनिल गंगावणे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेली मूर्ती भेट देऊन स्वागत करण्यात आले तसेच आपल्या गावचे माजी सरपंच श्री धनराज सुद्रीक यांचे हस्ते फेटा बांधून तसेच शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कौडाने गावचे नितीन सुद्रीक, भाऊसाहेब मूळे चेअरमन ,राजेंद्र सुद्रीक आबा , कल्याण जगधने चेअरमन , राजेश गंगावणे सरपंच, माजी सुभेदार श्री सुभाष गंगावणे , गणेश देवकाते ,माणिक सुद्रीक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.