बाल गोपाळांच्या दिंडीसोहळ्याचे केले भरभरून कौतुक.

संघर्षनामा न्यूज l कर्जत 

दि.१४जुलै २०२४

 कर्जत तालुका प्रतिनिधि, उज्वला उल्हारे

 आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेला वारकरी दिंडीच्या रूपाने असे लाखो वारकरी पंढरीच्या वाटेने विठ्ठलाच्या भक्ती पोटी दर्शनासाठी जात असतात, अशाच माध्यमातून सगळा आसमंत भक्तिमय झालेला असतो आणि अशाच वातावरणातून शालेय विद्यार्थी सुद्धा या भक्ती भावाने न्हावून निघत असतात. त्यातूनच सालाबाद प्रमाणे रुरल एज्युकेशन सोसायटीच्या मिरजगाव येथील नूतन मराठी प्राथमिक विद्यालयात सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाल वारकरी दिंडी सोहळा २०२४ अगदी उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या दिंडी सोहळ्यामध्ये प्रकर्षाने जाणवणारा भाग म्हणजे लेझीम पथकाने सर्व गावातील ग्रामस्थांचं मन आकर्षित केलं त्याचबरोबर  टाळांच्या गजरात संपूर्ण आसमंत निनादत  होता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेशभूषेस सह असलेले सर्व हे बाल वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. वारकरी विद्यार्थ्यांच्या फुगड्या पाहून सर्वांची भरपूर करमणूक झाली विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सूर्यवंशी सर यांच्या ह्या संकल्पनेतून हा सोहळा संपन्न झाला आणि याचं आयोजन, नियोजन  विद्यालयाचे शिक्षक वृंद संदीप हिंगणे सुरज चव्हाण शरद शिंदे एजाज शेख प्रतीक्षा सुपेकर संजय निंबाळकर या सर्वांनी उत्तम प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली या दिंडी सोहळ्यासाठी महिला पालक वनिता चाकणे, कावेरी घोडेचोर मॅडम, शितल पवळ,शुभांगी पवळ, कोमल कदम, कोमल शिंगाडे या माता पालकांनी सुद्धा खूप मोठे सहकार्य केले, तसेच वृषभ भंडारी, केदार बगाडे, आदेश बोरा, विकास कटारिया, आप्पासाहेब जाधव, पांडुरंग मिटकर, भैय्या शेख,ह भ प आदिनाथ बगाडे, ओम कन्हेरकर यांनी या बाल वारकरी मंडळींना खाऊ रुपी प्रसादाचे वाटप केले दिंडीस मूर्तीचे सहकार्य विनोद कांबळे यांनी तर पुष्पहार सोमनाथ म्हेत्रे यांनी देऊन सहकार्य केले या दिमाखदार दिंडी सोहळ्याचे संपूर्ण मिरजगाव पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. तसेच संस्था अध्यक्ष डॉ ए. बी चेडे,उपाध्यक्ष डॉ महेंद्र चेडे, सचिव प्रकाश चेडे, सहसचिव अंजलीताई चेडे, महादेव भुजबळ,  यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

Related Post