संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि .२९नोव्हेंबर २०२४
प्रतिनिधी,
श्रीगोंदा- नगर विधानसभा २०२४च्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेले युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते व त्यांच्या विजयाचे शिल्पकार त्यांची आई प्रतिभाताई (अक्का) पाचपुते व वडील माजी मंत्री आमदार बबनराव (दादा) पाचपुते यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार विक्रम पाचपुते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न ,पत्रकारांसाठी वसाहत व पत्रकार भवन पेन्शन योजना, अधिस्वीकृती बाबत प्राधान्य क्रमाने प्रयत्न करुन मार्गी लावु. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सर्व प्रलंबित मागण्या विधानसभेत मांडुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष माधव बनसुडे, उपाध्यक्ष मेजर भिमराव उल्हारे,नंदकुमार कुरुमकर, ज्ञानेश्वर येवले, सचिव डॉ अमोल झेंडे, खजिनदार किशोर मचे, सहसचिव सोहेल शेख, पत्रकार दादासाहेब सोनवणे, अमर घोडके ,डॉ. शिवाजी पवळ ,सचिन शिंदे ,अनिल तुपे,नितीन रोही,शफिक हावलदार,जावेद इनामदार, उज्वला उल्हारे यांच्या समवेत आदी पत्रकार मोठ्या उपस्थित होते.