संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२६नोव्हेंबर २०२४
प्रतिनिधी,
राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी लवकरच कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्य बाजार समितीचे सभापती श्री. बाळासाहेब नहाटा व मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन श्री दत्ताजी पानसरे यांनी दिली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता उद्या होणाऱ्या नगरपालिका ,पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार गट) ताकतीनिशी या निवडणुकीत उतरणार असून पंचायत समिती सह जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून पक्षांमध्ये नवीन सक्षम कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन पक्ष बळकटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लवकरच श्रीगोंदा तालुक्यात शेतकरी मेळावा आयोजित करणार असून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचा पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना दिशा देऊन पक्षाला मजबूत करण्याचे काम करण्यात येणार आहे.
श्रीगोंदा तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री नाहाटा व पानसरे यांनी माध्यमांना बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी श्री भगवान आबा पाचपुते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री संदीप मांडे यांचा सत्कार या मेळाव्यात करणार असल्याचे सांगीतले.