संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.३१ऑगस्ट २०२४
लिंपणगाव( प्रतिनिधी)--महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक,मा श्री संपतराव सूर्यवंशी साहेब यांनी श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट दिली. महाविद्यालयाच्या सर्व विभागाची पाहणी करून आनंद व्यक्त केला. करिअर कट्टा उपक्रमांतर्गत अनेक विद्यार्थी नोकरीस लागल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. महाविद्यालयात शैक्षणिक सुविधा अद्यावत आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि नोकरी च्या दृष्टीने विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.महाविद्यालयाची शिस्त आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा याचे कौतुक केले.
या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक मा प्राचार्य सचिनराव लगड सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी सर यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा कतोरे, पर्यवेक्षक प्रा प्रविण टकले, संस्थेचे विश्वस्त प्रा सुरेश रसाळ, तसेच प्राध्यापक व सेवक उपस्थित होते.