संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदे
दि.३०ऑगस्ट २०२४
लिंपणगाव ( प्रतिनिधी )दादा पाटील विदयालय कर्जत येथे 30 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व जुनिअरचा खेळाडू ओम पवार याने 60 किलो वजन गटात जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षक तुषार नागवडे व प्रा निसार शेख आदींनी मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.राजेंद्र दादा नागवडे; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; स्कुल कमेटीचे अध्यक्ष डी. आर. आबा काकडे; स्कूल कमिटीचे सर्व विश्वस्त; शिक्षण संस्थेचे निरीक्षक श्री.सचिनराव लगड सर; मुख्याध्यापक आनंदा पुराणे सर आदींनी अभिनंदन केले आहे.