भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट मध्ये घोटाळा, एस पी ऑफीस मध्ये ठेविदारांचा टाहो.

संघर्षनामा वृत्तसेवा lनगर

दि.२८ऑगस्ट २०२४

 (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट मुख्य शाखा पाईपलाईन रोड येथे पतसंस्थेमध्ये गेल्या २ वर्षापासून ठेवीदार हे वेळोवेळी रक्कम भरणा करत आहे. या संस्थेमध्ये ठेवीदारांनी अंदाजे रक्कम रुपये ५४ करोड रुपये संस्थेमध्ये जमा केलेले आहे. संस्थेचे चेअरमन भारत बबन पुंड व इतर १० संचालक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी संगम मताने गेल्या ६ महिन्यापासून ठेवीदारांना पैसे परत केले नाही. तसेच उडवा उडवी चे उत्तर देत असून ठेवीदारांना पैसे परत देत नाही या कारणास्तव सर्व ठेवीदारांनी निर्णय घेतला की संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गेले असता तेथे २० ते २५ दिवस लागतील गुन्हा दाखल होण्यासाठी व उडवा उडवी चे उत्तरे देत असून जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या मदतीने सर्व ठेवीदार पोलीस अधीक्षक कार्यालयावर गेले असून संबंधित भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या गैरकारभाराचा प्रश्न पोलीस अधीक्षक यांच्याकडे मांडणार असल्याची भावना ठेवीदारांनी व्यक्त केली असून पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आजच्या आज संस्थेचे चेअरमन व संचालक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत सर्व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Post