संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२७ऑगस्ट २०२४
प्रतिनिधी,
परभणी -परभणी जिल्ह्यातील मौजे ब्राह्मणगाव ता.जि. परभणी येथील मातंग समाजावर घरी जावून जातीयवाद्यांनी जीवघेना हल्ला करून जब्बर जखमी करण्यात आली.तेव्हा कांबळे कुटुंबानी त्यांचे नातेवाईक ज्योती ताई चव्हाण यांना फोन द्वारे माहिती कळवली तेव्हा ज्योती ताई यांनी लहू क्रांती संघर्ष सेना या संघटनेचे अध्यक्ष- राजू कसबे साहेब यांना कळविले तेव्हा संघटनेचे अध्यक्ष - राजू जी कसबे आणि परभणी जिल्हाध्यक्ष- विठ्ठल नाटकर ग्रामीण पोलीस स्टेशन परभणी येथे दाखल झाले आणि ब्राह्मणगाव येथील घडलेली घटना कांबळे कुटुंबीयांनी संघटनेच्या अध्यक्षांना कळवली तेव्हा संघटनेचे अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष- नाटकर यांनी एपीआय- हराळे सर यांच्याशी चर्चा करून मातंग समाजावर जो प्राण घातक हल्ला झाला,महिलांना मारहाण झाली, अल्पवयीन मुलीची छेडछाड झाली,जातिवाचक शिवीगाळ केली, घडलेली सर्व प्रकरण फार गंभीर स्वरूपाचे होते आणि या प्रकरणाला कारणीभूत असलेले जातीवादी गावगुंड यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,त्यांना कडक शासन झाले पाहिजे अशी विनंती केली आणि ग्रामीण पोलीस स्टेशन परभणी येथे गुन्हा नोंद करण्यात आला
त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष- राजू कसबे, परभणी जिल्हाध्यक्ष- विठ्ठल नाटकर आणि महिला आघाडी परभणी जिल्हा उपाध्यक्ष- ज्योतीताई चव्हाण यांच्या प्रयत्नाने मंदाबाई कांबळे यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला म्हणून लहू क्रांती संघर्ष सेना या सामाजिक संघटनेच्या प्रयत्नाने fir तयार होई पर्यंत पोलिस प्रशासनानं आरोपीला अटक करण्यात आले.