संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२५ऑगस्ट २०२४
भारतरत्न डॉक्टर आंबेडकर साहेब यांनी आपल्या आई व्यतिरिक्त भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे आदर्श घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले.
त्यांच्या जीवनात एक प्रसंग असा आला होता की, त्यांच्या आई आजारी होत्या तेव्हा त्यांच्याजवळ कोणीही वैद्य आला नाही.
त्याचे कारण हे होते की, त्या अस्पृश्य होत्या.
त्या स्वर्गवासी झाल्या.
तोच डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट होता.
तत्कालीन समाजाला जो मानसिक रोग होता.
त्याचा इलाज करणे जरुरी आहे असे त्यांना वाटले.
समाजातील जे वंचित आहेत त्यांना समानतेचा अधिकार मिळावा म्हणून
त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला.
आणि आपल्या साठी खूप चांगले संविधान दिले आहे. त्यामध्ये सर्वांना मौलिक अधिकार दिलेले आहेत.
सर्वात महत्त्वाचा अधिकार हा स्वतंत्रतेचा नसून तो समानतेचा आहे.
समानतेचा हक्क खूप जरुरी आहे.
अनुच्छेद 14, 15, 16, 17 व 18 हे सर्वांना समानतेचा हक्क देण्यासाठी बनविला आहे .
डॉक्टर आंबेडकर साहेब यांनी आपणाला शिकवण दिली आहे की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
जो जितके जास्त पीइल तो तितकाच डरकाळ्या फोडील.
एक वेळेस तुमच्या पायात चप्पल नसली तरी चालेल....
परंतु तुमच्या हातामध्ये पुस्तक असले पाहिजे.
वंचित समाजाकडे धनसंपत्ती नसते.
म्हणून त्यांच्या जवळ एकच पर्याय उरतो.
तो म्हणजे शिक्षण.
जे मागासलेल्या समाजाचे आहेत.
असे सांगायला काही लोकांना लाज वाटते.
त्यामध्ये मुख्यतः आय ए एस, आय पी एस अधिकारी आहेत.
आपण कोणत्याही पदावर असलो तरी, ज्या समाजाचे आहोत त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आरक्षण का दिले जाते?
याचा मुख्य उद्देश काय आहे?
ते आपण समजून घेणे अतिशय गरजेचे आहे.
आपल्या वंचित समाजाचा एक आय ए एस, आय पी एस आणि नेता बनला तर, तो आपल्या समाजाच्या समस्या सोडवेल.
असा समाजा मध्ये भरवासा निर्माण होतो.
म्हणून जे आय ए एस, आय पी एस आणि नेता बनतात.
त्यांनी कुणाचे भाऊ बनावे, आणि ज्या महिला आहेत त्यांनी कुणाचे बहीण बनावे.
आपल्या समाजाच्या समस्या सोडवाव्यात.
समाजाने तुमच्यासाठी खूप आहुती दिलेली आहे.
हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.
तुम्ही आयुष्यभर त्यांची मदत केली तरी त्यांच्या ऋणामधून मुक्त होऊ शकणार नाही.
याची जाणीव ठेवावी.
आपल्या समाजाला मदत करताना कोणत्याही प्रकारचे गैर कानूनी व असंवैधानिक कार्य करून मदत करू नका...!!
सर्व नियमाच्या अंतर्गत करा, समाजामध्ये कुणावर अन्याय होत असेल तर, त्यांना मदत करा.
आपल्या समाजाला मुख्य धारेच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी सतत प्रयत्न करीत रहा.
लक्षात ठेवा!! व्यक्तीची ओळख त्याची योग्यता आणि मेहनत पाहून झाली पाहिजे ना की जात.
आपल्या समाजाला शिक्षित बनवा!! त्यांची साथ द्या.
संत कबीर सांगून गेले आहे की:-
जाती ना पूछो साधू की
पुछ लिजिए ज्ञान!
मोल करो तलवार का
पडी रहने दो म्यान.
ज्यांना अवसर मिळतो त्यांनी त्याचे सोने करा...!!
प्रेरणास्रोत बना!! तुम्ही गेल्यानंतर लाखो करोडो लोक आनंदाने जगतील असे मोठे कार्य करून जा.
डॉक्टर आंबेडकर साहेब म्हणाले होते की माझा जन्मदिवस साजरा करू नका...!!
मला भगवान मानू नका!!
परंतु समाजासाठी त्यांनी एवढे मोठे कार्य केले आहे.
म्हणून त्यांना सन्मान देणे समाजाचे कर्तव्य आहे.
आणि तो सन्मान त्यांना मिळायलाच हवा.
म्हणून त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून त्यांना सन्मान दिला जातो.
कवी हसमी यांनी मजदूरांसाठी एक छान गीत लिहिलेले आहे.
त्याचे बोल असे:-
पढणा लिखना सिख लो मेहनत करने वालो!
पढना लिखना सीखो वो भूक से मरने वालो!
क ख ग घ को पहचानो आलेख को पढणा सिखो!
अ आ इ ई को हत्यार बनाकर लढणा सिखो.
आपले संविधान प्रत्येक नागरिकांनी वाचले पाहिजे.
त्यामधील कायद्या बद्दल सर्वांना माहिती असली पाहिजे.
आपण वाचन जरूर करा...!!
परंतु ज्या साहित्याचे वाचन करीत आहात, त्यामधून आपल्या समाजाचा फायदा होईल असेच वाचन करा.
मा.सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर