संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२०ऑगस्ट २०२४
प्रतिनिधी,
भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन तसेच कारगिल विजय दिनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी सोहळा गुरुवार, दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी उपमुख्यमंत्री ना. मा.श्री.अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार मा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर, आमदार मा.श्री. सुनील आण्णा टिंगरे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सूरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, लोहगाव चे जेष्ठ नेते मा. श्री. पांडुरंग आप्पा खेसे आदींसह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गजानन मंगल कार्यालय, लोहगाव, पुणे येथे ध्वजारोहण करून तसेच कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर सैनिकांना मानवंदना देऊन, अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विर-पत्नी, कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या वीर सैनिकांचा व माजी सैनिकांचा सन्मान राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
सैनिकांच्या खालील महत्वाच्या मागण्या दादांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या व लवकरात लवकर यावर सकारामत्क निर्णय घेऊ असा विश्वास दिला:
१. लोहगाव मधे शहीद स्मारक व सैनिक भवन व्हावे.
२. सध्या पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय खूपच छोटे असल्याने मोठी इमारत मिळावी.
३. गावातील पोलीस पाटील हे पद माजी सैनिकांना राखीव असावे.
४. माजी सैनिकांना राजकीय क्षेत्रात आरक्षण असावे.
५. गावातील ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती अध्यक्ष पद हे
माजी सैनिकांना राखीव असावे.
६. युद्धात शहीद झालेल्या वीर पत्नींना व मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावे.
७. सैनिकांच्या कामकाजासाठी सैनिक कल्याण मंत्र्याची स्वतंत्र नियुक्ती व्हावी.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल च्या शेकडो माजी सैनिकांनी केले. सैनिक संवाद व सन्मान सोहळ्यास हजारो माजी सैनिकांनी उपस्थिती दाखविल्या बद्दल मनापासून आभार आभार मानण्यात आले.