संघर्षनामा न्युज l श्रीगोंदा
दि.१७ऑगस्ट २०२४
प्रतिनिधि,
श्रीगोंदा :- येथील परिक्रमा शैक्षणिक संकुल मध्ये भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन युरोपीय पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंटरनॅशनल आयुर्वेदा असोसिएशन व परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या माध्यमातून परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी येथे आरोग्य विषयक युरोपियन तज्ञांची बैठक आयोजित केली होती. संस्थेचे सचिव विक्रमसिंह पाचपुते यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी फिना मऊरी (क्याटालोनिया), थॉमर फर्नडिस(स्पेन), अवरी येली डोमिंगेज (अंदोरा) , आले हांद्रो ओला रियागा (अर्जेंटिना) यांच्यासह अन्य १० अतिथी सादर परिसंवादा सठी उस्थित होते. इंटरनॅशनल आयुर्वेदा असोसिएशनचे संस्थापक डॉ. अतुल राक्षे यांनी या परिसंवादाचे संचालन केले.
ग्लोबल विलेज फॉर सोशल वेल्फेअर या नुसार काम करणाऱ्या परिक्रमा शैक्षणिक संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेद आणि योगा याचा प्रसार करण्या साठी इंटरनॅशनल आयुर्वेदा असोसिएशन यांच्यामध्ये दीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. अतुल राक्षे यांनी आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी जगभर मध्ये असलेल्या संधी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
परिक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सिंह पाचपुते यांनी परिक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञान सुविधा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती उपस्थिताना दिली. यावेळी भारतामधील ग्रामीण भागातील काष्टी सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा नॅक मानांकनामध्ये केलेली उत्तम कामगिरी पाहून परदेशी पाहुणे देखील भारावून गेले. या परिसंवादामध्ये युरोपीय तज्ञांंबरोबर प्रताप सिंह पाचपुते, प्रशासकीय अधिकारी अनिल पुंड, अकॅडमीक डायरेक्टर डॉ. संजीव कदम पाटील, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील निर्मळ, डॉ.रमेश शिंदे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संजीवन महाडिक, विभाग प्रमुख मोहन धगाटे, प्राचार्य डॉ. सुवर्ना निर्मळ, प्राचार्य इथापे यांसह प्राध्यापक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.