संघर्षनामा न्युज l श्रीगोंदा
दि.३ ऑगस्ट २०२४
प्रतिनिधी,
जीवना मध्ये आपण ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवीत असतो तीच व्यक्ती तुम्हाला धोका देते.
1. नदीचा प्रवाह शांतपणे वाहत असतो म्हणून, नदीवर भरवसा करणे चुकीचे आहे.त्याचे कारण असे आहे की, बाहेरून शांत दिसणारी नदी आत मध्ये विराट आणि धोकादायक असू शकते. मध्यभागी धारेचा प्रवाह खूप जोरात असू शकतो.
2. जे मतलबी माणसं असतात. ते फक्त आपल्या स्वतःचाच फायदा बघतात. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणे नेहमी धोकादायक असते. यांच्यापासून नेहमी सावध राहावे. कारण ते त्यांच्या फायद्यासाठी कितीही खालच्या पातळीवर जाऊ शकतात.
3. राज घराण्यामधील व्यक्ती आणि मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीवर चुकूनही विश्वास ठेवू नका. ते तुम्हाला नंतर खूप हानिकारक होऊ शकते. यांच्याबरोबर दोस्ती व दुश्मनी सांभाळूनच करावी. कारण असे लोक सत्तेचा आणि पदाचा दुरुपयोग करून तुमचे नुकसान करू शकतात.
4. कुणावरही भरोसा करण्या अगोदर त्याला सोनारा सारखे पारखा. सोन्याला तो रगडून, तोडून, जाळून आणि हातोडीने ठोकून पारखतो त्याचप्रमाणे माणसांना पारखावे.
5. त्यागाची भावना असली पाहिजे. तरच ती व्यक्ती दुसऱ्याचे भले करू शकते.
6. ज्यांचे विचार आणि चारित्र्य खराब असेल तर, अशा व्यक्तीवर कधीही भरोसा ठेवू नये.
7. ज्या व्यक्तीजवळ गुना पेक्षा अवगुनच जास्त आहेत, अशा व्यक्तीपासून नेहमी दूर राहिलेले केव्हाही बरे असते. अशा व्यक्तींच्या संगतीमुळे त्याचा दुष्परिणाम तुमच्यावर पडतो.
मा.सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर