संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे
दि.३ ऑगस्ट २०२४
आष्टी(अण्णासाहेब साबळे) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिरानिमित्त आष्टी नगरपंचायत चे नगराध्यक्ष जिया बेग यांचे बंधू डॉ.मिर्जा बेग वैद्यकीय अधिकारी टाकळसिंग,यांच्या रक्तदान शिबिराने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मातंग समाच्या अ ब क ड वर्गवारीसाठी जलसमाधी घेणारे संजय भाऊ ताकतोडे यांचे वडील ज्ञानोबा ताकतोडे,माजी जिल्हा परिषद सदस्य सतिष आबा शिंदे,ॲड प्रदिप भाऊ चव्हाण रयत सेवा संस्थापक अध्यक्ष,माजी परिषद सदस्य नवनाथ चखाले यांनी डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट दिली,माजी सरपंच केशव बांगर,बापूराव नागरगोजे, ज्ञानेश्वर साळवे,माजी नगरसेवक ज्ञानदेव वाल्हेकर,मल्हारी शिंदे सर सरपंच गौखेल यांच्यासह विविध क्षेत्रातील समाज बांधवांनी रक्तदान करून ऐकतेचा संदेश दिला.साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती उत्सव निमित्त आष्टी येथील पंचायत
समिती हॉलमध्ये रक्तदान शिबीर आयोजन शोषित विकास संघटनेचे नेते मा.श्री जालिंदर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.31जुलै २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते त्या कार्यक्रमासाठी संघटनेच्या इतर सर्व सदस्यांनी एकत्रित प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला त्या कार्यक्रमाच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग खवळे,राष्ट्रीय उपाध्यक्ष नागेश डाडर,राष्ट्रीय सचिव भगवान भोसले,युवा तालुका अध्यक्ष गोकुळ वाल्हेकर, पत्रकार सचिन रानडे,पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब साबळे,पत्रकार शरद गर्जे,पाटोदा तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे आणि त्यांचे सहकारी तसेच आष्टी येथील त्यांच्या संपूर्ण सहकारी प्रा.ज्ञानदेव गाडे सर,प्रा.अंबादास शिरोळे सर,भाऊसाहेब शिरोळे, शिवाजी पुलावळे,यांची उपस्थिती होती.या रक्तदान शिबिरात आनंदऋषिजी ब्लड सेंटर,अहदनगर,जनसंपर्क अधिकारी.श्री.सुनिल महानोर सर व सहकारी,शोषित विकास संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.