चिखली येथे ग्रामदैवत लक्ष्मी माता देवी जत्रा उत्सव जल्लोषात साजरा..

संघर्षनामा न्यूज l आष्टी 

दिनांक २ ऑगस्ट २०२४

प्रतिनिधी, उज्वला उल्हारे 


 चिखली ता.आष्टी जि.बीड येथील सुप्रसिद्ध ग्रामदैवत लक्ष्मी माता देवीचा जत्रा उत्सव सोहळा जल्लोषात आनंदात संपन्न झाला..

सालाबाद प्रमाणे आषाढी अमावस्येच्या अगोदर येणाऱ्या शुक्रवारी जत्रा उत्सव भक्ती भावाने साजरा होत असतो या अनुषंगाने शुक्रवार दि. २ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ५ वाजता गावचे मानकरी यांच्या हस्ते देवीची विधीवत पूजा करण्यात आली.

राज्यातून,पंचक्रोशीतील आलेल्या भाविक भक्तांनी देवीला नतमस्तक होऊन दर्शन करत नवसपुर्ती करताना असंख्य भाविकांची, महिला भगिनींची प्रचंड गर्दी दिसून आली.

गेली ४वर्षापासून चाललेल्या अविरत मंदिर बांधकामासाठी गाव ग्रामस्थ, भक्तगण ,यात्रा कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून कार्यरत असताना आणि कलस रोहन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गावच्या मुलींनी दिलेल्या ११ लाखाच्या अनमोल देणगीतून झालेला कार्यक्रम आणि भव्य मंदिर,कमान परिसर रमणीय भक्तीरसात न्हाऊन गेलेला दिसून आला.

 मनमोहक विद्युत रोषणाई दिमतीला मंदिर कलश रोहन ,मूर्ती प्राणप्रतिष्ठा  सोहळ्याप्रसंगी गावातील मुलींचा गाव ग्रामस्थांच्या वतीने माहेरची साडी देऊन सन्मान करण्यात आलेला आहे असं यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. 

सत्वाची आई लखाई, मनोकामना पूर्ण करून नवसाला पावणारी लक्ष्मी माता असणाऱ्या ग्रामदैवताचं पंचक्रोशीतील भावकांच्या हृदयात आढळ स्थान असल्याने मनोभावे यात्रा उत्सव साजरा होत असताना संध्याकाळी ६ वाजता पोतराज मंडळींनी देवीच्या मंदिरासमोर येऊन पारंपारिक वाद्याच्या गजरात तुफानी नाचत रंगत देवीची आराधना केली याचा सर्वच भाविक भक्त ,महिला भगिनींनी आनंद घेतला..

 महाआरती नंतर घरोघरी सवाष्णी जेवण ,महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रम संपन्न झाला .

हा अभूतपूर्व यात्रा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव नाना शिंदे ,सरपंच नवनाथ वाघ ,उपसरपंच हारुणभाई शेख ,ग्रामपंचायत सदस्य भाऊ शिंदे ,अशोक चखाले ,दत्तात्रय गोयकर, माजी सरपंच विठ्ठल चखाले, सामाजिक कार्यकर्ते अंकुश आवारे ,दिवाकर कुलकर्णी, नामदेव आवारे ,सुधाकर कोकणे ,अशोक शिंदे ,अशोक कोकणे, विजय आवारे ,सतीश आवारे सर ,करीम शेख सर, लक्ष्मण घोलप, वजीर पठाण, दिगंबर शिंदे व मंदिराचे पुजारी किसन जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Post