संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे
दि.२ ऑगस्ट २०२४
लिंपणगाव (प्रतिनिधी)
सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे संचालक आणि मढे वडगाव चे सुपूत्र मा श्री सुभाष काका शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट)श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार केला. ग्रामपंचायत मढेवडगाव, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, मढेवडगाव, म्हातारपिंप्री, बाबूडी,शिरसगाव बोडखा या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.
लोकनियुक्त सरपंच मा प्रमोद शिंदे, चेअरमन मा प्रकाश उंडे, उपसरपंच मा राहुल साळवे, जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष मा स्मितल भैय्या वाबळे मा चेअरमन बापूसाहेब वाबळे,पिंप्री चे चेअरमन मा परेश भाऊ वाबळे, मा महेश तावरे, मा शहाजी हिरडे, उपसरपंच मा अनिल पोकळे यांच्या शुभहस्ते हा नागरी सत्कार झाला.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा सुभाष काका शिंदे यांनी राजकारणात एकनिष्ठ राहिल्याने या पदापर्यंत पोहचू शकलो असे सांगितले. स्व शिवाजीराव बापू नागवडे तसेच मा श्री राजेंद्र दादा नागवडे आणि नागवडे कुटुंबाशी एकनिष्ठ राहून जनतेचा विश्वास संपादन केला त्यामुळे युवक काँग्रेसचा शाखा अध्यक्ष पासून सुरू झालेला हा राजकीय प्रवास गेली 35 वर्षे सहकार क्षेत्रात काम करून अखंडपणे चालू आहे. लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात उपस्थित असल्याने राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोक प्रेम करतात. या पदाचा उपयोग गावच्या विकासासाठी नक्कीच करून घेईल. तरुणांनी एकनिष्ठ राहून समाजकारण करावे असा सल्ला ही त्यांनी या प्रसंगी दिला.
मा प्रमोद शिंदे,मा स्मितल भैय्या वाबळे, उपप्राचार्य एस एन उंडे सर,मा राहुल साळवे, मा महेश तावरे, मा साहेबराव उंडे, मा संतोषराव गुंड साहेब,मा पंडितराव वाबळे, मा हनुमंत झिटे,प्रा योगेश मांडे,मा नवनाथ उंडे,मा रावसाहेब मांडे यांची शुभेच्छा पर भाषणे झाली
या कार्यक्रमाला श्री नानासाहेब मांडे,मा गेना नागू मांडे, मा संपत मोहिते, मा मुख्याध्यापक ससाणे सर, मा डॉ अनंत पवार, मा बापू निवृत्ती मांडे, मा अनिल शंकर शिंदे, मधुकर शिंदे, बाळासाहेब नथु मांडे,बापूराव शिंदे,वैभव तावरे, महेश थोरात, लालासाहेब जहागीरदार, जगगु मामा पाटोळे, संतोष सोमवंशी, विलास महामुनी,मा सरपंच प्रवीण शिर्के, शंकर मांडे, महादेव गरड,भिमराव फरकांडे,मुख्याध्यापक शरद उंडे, रावसाहेब जाधव, वसंत साळवे,बाळासाहेब फाफळे, कृषी अधिकारी शिंदे साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सोसायटी संचालक,ग्रामसेवक, शिक्षक, चारही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एन टी पवार यांनी केले तर आभार मा निळकंठ उंडे यांनी मानले.