संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे
दि.१ऑगस्ट २०२४
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यात धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सालाबाद प्रमाणे याही वर्षी लिंपणगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य असे आयोजन करण्यात आल्याची माहिती या सोहळ्याचे मार्गदर्शक ह भ प संजय महाराज गिरमकर यांनी दिली.
अधिक माहिती देताना ह भ प गिरमकर महाराजांनी सप्ताह सोहळ्याची पार्श्वभूमी सांगताना म्हणाले की; वैकुंठवासी ह भ प गुरुवर्य तात्या महाराज महापुरुष श्रीगोंदा यांच्या मंगल आशीर्वादाने जेष्ठ कीर्तनकार अविनाश महाराज साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सालाबाद प्रमाणे यावर्षी लिंपणगाव येथे सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून; या सप्ताहाचे 32 वे वर्ष असून; या सप्ताह दरम्यान पंचक्रोशीतील ग्रामस्थ भक्तगण अगदी आनंदी व भक्तिमय वातावरणात सोहळ्यामध्ये सदर सोहळ्यामध्ये सहभागी होतात. आयोजन करतात.
* किर्तन सोहळ्याची रूपरेषा पुढील प्रमाणे मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 पासून तर ते मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 पर्यंत आठ दिवस सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती देताना श्री गिरमकर महाराज यांनी सांगितले की सायंकाळी चार ते पाच प्रवचन तर सायंकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ आणि त्याच रात्री सात ते नऊ हरिकीर्तनाचे आयोजन केले आहे. मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी पहिल्याच दिवशी राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे भव्य असे किर्तन होणार आहे. तर बुधवारी सात ऑगस्ट रोजी वाणीभूषण ज्ञानेश्वर महाराज तांबे जेऊर हैबती यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी आठ ऑगस्ट रोजी विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी दिनेश महाराज केदार कडेठाण यांचे कीर्तन आयोजित केले आहे. तर शनिवारी 10 ऑगस्ट रोजी सप्ताह सोहळ्याचे मार्गदर्शक संजय महाराज गिरमकर आनंदवाडी यांचे कीर्तन होणार आहे. रविवारी 11 ऑगस्ट रोजी कैलास महाराज केंजळे धर्मपुरी यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी 12 ऑगस्ट रोजी ह भ प प्रकाश महाराज साठे धारूर यांचे कीर्तन आयोजित केले आहे. त्यानंतर मंगळवारी 13 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ कीर्तनकार सोपानराव महाराज सानप हिंगोली यांचे सकाळी ९ ते 11 काल्याचे किर्तन होणार आहे. त्यादिवशी उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी तालुक्यातील भाविक भक्तांनी या श्रावणी सुखाचा उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सोहळ्याचे मार्गदर्शक संजय महाराज गिरमकर व सप्ताह मंडळाने केले आहे.