पूरग्रस्त भागातील नुकसानीची अनुराधाताई नागवडे यांच्याकडून पाहणी

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.२८जुलै २०२४

  नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)--पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा घोड नद्यांना महापुर आल्याने श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी काठावर असलेल्या गावांना या महापुराचा फटका बसत शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा जिल्हा बँक संचालिका सौ अनुराधा नागवडे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्त भागातील शेतकरी व ग्रामस्थ यांना धीर देत संवाद साधला.

       श्रीगोंदा तालुक्यात मागील आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असतानाच पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा  नदीला महापुर आल्याने भीमा नदीच्या काठावरील गार, कौठा, अनगर, आर्वी या गावांना पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. जोरदार पावसाने तसेच पुराने पेरलेला कांदा, उडीद, कापूस आदी पिकांची नासाडी झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाने प्रभावित झालेल्या क्षेत्रातील पिकांचे तात्काळ पंचनामे करत शासनास अहवाल सादर करण्याची सूचना तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे यांना केली. यावेळी नागवडे कारखान्याचे संचालक विश्वनाथ दादा  गिरमकर, प्रताप शिवलकर राजेंद्र चव्हाण, महेश कवडे, हनुमंत गिरमकर, पोपट नागवडे, बापूराव क्षिरसागर सुवर्णा नागवडे उपस्थित होते.

Related Post